रत्नागिरीत गुन्हेगारांवर
आता ‘एआय’ची नजर
रत्नागिरी, ता. १७ : रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक ऐतिहासिक ठरेल, असे पाऊल उचलले आहे. पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या दूरदृष्टीने आणि मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये ‘आरएआयडीएस’ (रत्नागिरी ॲडव्हान्स्ड इंटिग्रेटेड डाटा सिस्टिम) हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित नावीन्यपूर्ण डिजिटल अॅप्लिकेशन विकसित केले आहे. अशाप्रकारे ‘एआय’चा गुन्हे तपासासाठी वापर करणारे रत्नागिरी पोलिस दल हे देशातील पहिले पोलिस दल ठरले आहे. यामुळे तपासाला एक नवी दिशा मिळाली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली.
पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी ॲप्लिकेशनचे सादरीकरणही केले. या अॅप्लिकेशनमुळे पोलिस आणि जनता यांच्यातील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्ती आणि हिस्ट्रिशिटर, वॉन्टेड आरोपी किंवा एनडीपीएसमधील गुन्हेगारांचा शोध घेणे सोपे झाले आहे. अॅपमधील एआय तंत्रज्ञान एकाच फोटोवरून १०८ प्रकारच्या विविध प्रतिमा (ईमेज) तयार करू शकते. जर एखाद्या आरोपीने अटक टाळण्यासाठी दाढी वाढवली, डोक्यावर टक्कल केले किंवा लांब केस ठेवून आपली वेशभूषा बदलली तरीही ‘देवदृष्टी’च्या मदतीने पोलिस त्याला अचूक ओळखू शकणार आहेत.
------------
काय कलम लावायचे, हेही सांगणार
देशात लागू झालेल्या नवीन ‘भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) २०२३’ च्या अंमलबजावणीसाठी हे फिचर अत्यंत उपयुक्त आहे. जर एखाद्या पोलिस अंमलदाराला विशिष्ट घटनेत कोणते कलम लावावे, याबाबत शंका असेल तर केवळ गुन्ह्याचे वर्णन ‘सर्चबार’मध्ये लिहिल्यास हे अॅप तत्काळ संबंधित कलमाबाबत सल्ला देणार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.