पुणे

गुंतवणूक, ‘एआय’वर मार्गदर्शन

CD

(१९ मे च्या मुख्य अंक पान ३ वर प्रसिद्ध झालेला क्यूआर कोड या बातमीत वापरावा)

पुणे, ता. १८ : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), बदलती जागतिक अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीच्या नव्या संधी या विषयांवर प्रकाश टाकण्यासाठी ‘मार्सेलस इन्व्हेस्टमेंट मॅनजेर्स’ आणि ‘सकाळ माध्यम समूह’ यांच्यातर्फे विशेष आर्थिक साक्षरता व ज्ञानमालिका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवारी (ता. २४) सकाळी १०.३० वाजता पौड फाटा येथील अभिनव विद्यालय इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळेत होईल.
वेगाने बदल होणाऱ्या तांत्रिक युगात पारंपरिक गुंतवणुकीपलीकडे जाऊन जागतिक संधींचा वेध घेणे आवश्यक ठरले आहे. अमेरिका आणि युरोपमधील कंपन्यांमधील गुंतवणुकीच्या संधी, ‘एआय’मुळे होणारे आर्थिक बदल आणि भविष्यातील संपत्तीनिर्मितीचे मार्ग, यावर या कार्यक्रमातसखोल चर्चा होणार आहे. प्रामुख्याने उद्योजक, व्यावसायिक, डॉक्टर आणि आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल.
गुंतवणूकतज्ज्ञ सौरभ मुखर्जी ‘द केस फॉर ग्लोबल डायव्हर्सिफिकेशन’ विषयावर मार्गदर्शन करतील. तंत्रज्ञान अभ्यासक अच्युत गोडबोल ‘एआय आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम’ विषयावर व्याख्यान देतील. ‘एआय’मुळे बदल होणारी रोजगारव्यवस्था आणि व्यवसायातील नव्या शक्यतांचा वेध ते घेणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून आसन व्यवस्था मर्यादित आहे.

‘एआय’मुळे भारतासमोर अनेक आव्हाने निर्माण होत असली, तरी मध्यमवर्गासाठी नव्या संधीही उपलब्ध होत आहेत. एआय क्षेत्रातील प्रचंड वाढीचा लाभ घेण्यासाठी एआय-आधारित नवोपक्रम आणि अंमलबजावणीत आघाडीवर असलेल्या उच्चदर्जाच्या जागतिक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय आता उपलब्ध आहे. मार्सेलसची ग्लोबल पोर्टफोलिओ ही सेवा ‘गिफ्ट सिटी’च्या माध्यमातून ग्राहकांच्या दीर्घकालीन संपत्तीवाढीसाठी मदत करत आहे.
- सौरभ मुखर्जी

‘एआय’मुळे प्रचंड प्रमाणात नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. काही प्रमाणात नवीन नोकऱ्याही तयार होतील. पण अशा परिस्थितीत सातत्याने आपली कौशल्ये वृद्धिंगत करत राहिले पाहिजे आणि आपण आयुष्यभर सतत ‘अनलर्न’ आणि ‘लर्न’ करत राहिले पाहिजे. तरच आपण उद्याच्या जगात चांगल्या तऱ्हेने प्रगती करू शकू. अनेक तज्ज्ञांच्या मते प्रत्येकाला त्याच्या, तिच्या करिअरमध्ये जुने विसरून नवे शिकण्याची प्रक्रिया कमीत कमी ४ वेळेला तरी करावी लागेल आणि आपण त्याची तयारी ठेवली पाहिजे.
- अच्युत गोडबोले

कार्यक्रमाविषयी...
केव्हा : रविवार, (ता. २४)
कधी : सकाळी १०.३० त १२.३०
कुठे : अभिनव विद्यालय इंग्रजी माध्यम
प्राथमिक शाळा, पौड फाटा, दशभुजा
गणपती मंदिराच्या मागे, पुणे

- सकाळी १० वाजल्यापासून नोंदणी व अल्पोपहार
संपर्क : ९८८१५९८८१५

नोंदणीसाठी क्यूआर कोड स्कॅन करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs MI Live: ना तुला, ना मला... दीपक चहर अन् रॉबिन मिंझ यांची 'पाकड्यां'सारखी फिल्डींग; हार्दिक पांड्यावर तोंड लपवण्याची वेळ Video

KKR vs MI Live: दीपक चहरने कोलकाताच्या फॅन्सना डिवचले; Finn Allen ची विकेट, सूर्याला थांब म्हणाला अन् पुढे काय केले ते पाहाच Video

Tamil Nadu Politics: तमिळनाडू सरकार अडचणीत? राष्ट्रपती राजवटीची मागणी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, प्रकरण काय?

Konkan Tourism : तारकर्लीत ‘आयएनएस गुलदार’चे पाण्याखालील संग्रहालय; नियंत्रित जलसमाधीमुळे कोकण पर्यटनाला नवी ओळख

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर पुण्यातील आरसीसी मोटेगावकर क्लासला महापालिकेची टाळेबंदी

SCROLL FOR NEXT