‘महाविस्तार एआय’ दिवस उत्साहात
ॲग्रोवन वृत्तसेवा
सातारा : कृषी विभागाच्या वतीने सासकल (ता. फलटण) येथे ‘महाविस्तार एआय’ दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. राज्य शासनाच्या कृषी विभागाने विकसित केलेले कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ॲप शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत असून, सासकल गावातील ९४.२४ टक्के म्हणजेच ७२१ शेतकऱ्यांनी हे ॲप डाऊनलोड करून राज्यात वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
या वेळी सहायक कृषी अधिकारी सचिन जाधव यांनी शेतकऱ्यांना ॲपच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. हे ॲप शेतकऱ्यांना पेरणीपासून ते बाजारपेठेपर्यंतची सर्व तांत्रिक माहिती, हवामान अंदाज, खत व्यवस्थापन, बाजारभाव आणि पिकांवरील रोग व कीड नियंत्रणाचे उपाय स्थानिक मराठी भाषेत त्वरित उपलब्ध करून देते.
शेतकरी आवाजाद्वारे किंवा मजकुराद्वारे सहजपणे प्रश्न विचारू शकतात. या कार्यक्रमास उपसरपंच सोनाली मदने, माजी उपसरपंच राजेंद्र घोरपडे, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत मुळीक, ग्रामविकास अधिकारी अशोक सापते यांच्यासह सासकल परिसरातील शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.