AKK26B05822
अक्कलकोट : येथील कै. पंचप्पा कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात बौद्धिक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी, संस्थेचे सचिव मल्लिकार्जुन मसुती, महेश कापसे आदी.
विद्यार्थ्यांनी एआय प्रणाली स्वीकारावी
मल्लिनाथ कल्याणशेट्टी; कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात कार्यक्रम
.......
अक्कलकोट, ता. १ : संगणक, मोबाईल अन् इंटरनेट यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. त्यामुळे एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) प्रणाली मानवाच्या प्रगतीसाठी उपयुक्त असून तिचा विद्यार्थ्यांनी स्वीकार केला पाहिजे असे प्रतिपादन संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित कै. पंचप्पा कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात संस्थेचे सचिव मल्लिकार्जुन मसुती यांच्या हस्ते बौद्धिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची एआयसंदर्भात भाषणे झाली. त्यानंतर कल्याणशेट्टी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. भीमराव साठे, संचालक महेश कापसे, प्राचार्य राजेंद्रसिंह लोखंडे, माजी मुख्याध्यापक बापूजी निंबाळकर, अशोक दंतकाळे, माजी पर्यवेक्षक शिवानंद पुजारी, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, दिगंबर जगताप, सूर्यकांत रूगे आदी उपस्थित होते.
श्री कल्याणशेट्टी म्हणाले की, आरोग्य क्षेत्रात रोगांचे निदान, शस्त्रक्रियेमध्ये रोबोट्सचा वापर. बँकिंग, शेअर बाजार, वाहतूक, व्यवस्था, शेती, ई-व्यवहार, सोशल मीडिया आणि ग्राहक सेवा या सर्व ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे समाजाची प्रगती होत आहे. माणसाला वेळखाऊ व धोकादायक असलेली कामे एआय सहज करू शकते. तसेच एआयमुळे नवीन संशोधन, तंत्रज्ञान विकास आणि नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.
प्रारंभी स्व.पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी यांनी केले. एआयप्रणाली विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक बौद्धिक कार्यक्रमात समर्थ पवार, वेदांती मसलेकर या विद्यार्थ्यांची एआय प्रणालीवर अभ्यासपूर्ण भाषणे झाली. सूत्रसंचलन कल्पना स्वामी यांनी तर दिगंबर जगताप यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.