पुणे

‘एआय’ शिकणे ही काळाची गरज

CD

पुणे, ता. १६ : ‘‘गुगल ही माहितीची लायब्ररी होती, आता ‘चॅटजीपीटी’ सारखी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साधने थेट उत्तर देणारे प्राध्यापक बनले आहेत. त्यामुळे माहिती मिळवण्याची आणि बातम्या वाचण्याची पद्धत झपाट्याने बदलत असून पत्रकारांनीही ‘एआय’ शिकणे काळाची गरज आहे,’’ असे प्रतिपादन इंडिया टुडे समुहाच्या तक वाहिनीचे व्यवस्थापकीय संपादक मिलिंद खांडेकर यांनी शनिवारी केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि ‘फ्रेंड्स ऑफ व्यंकटेश’च्या वतीने आयोजित व्यंकटेश चपळगावकर स्मृती व्याख्यानात ‘एआय क्रांती: पत्रकारिता बहरेल की ओसरेल?’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे, संघाचे सरचिटणीस मंगेश फल्ले आदी उपस्थित होते.

खांडेकर म्हणाले, ‘‘एआय आता लेखन, माहितीचे विश्लेषण, ग्राफिक्स, संगीत आणि व्हिडिओ निर्मितीही करू लागला आहे. पूर्वी वृत्तपत्र निर्मितीत कंपोजिटर, मुद्रितशोधक, पेजमेकर अशा अनेक टप्प्यांमधून काम व्हायचे. आता हे सर्व संगणकावर होते. टीव्ही पत्रकारितेतही एकेकाळी सहा-सहा जणांचे पथक लागायचे. आता मोबाईलवरून थेट प्रक्षेपण शक्य झाले आहे. मात्र मूळ वार्तांकन, घटनास्थळी जाऊन माहिती गोळा करणे आणि बातमीचा अर्थ समजून घेणे, हे काम अजूनही माणसालाच करावे लागते.’’ प्रास्ताविक प्रतिभा चंद्रन यांनी केले, तर स्वागत मयूरेश कोण्णूर यांनी केले. प्राची कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. ब्रिजमोहन पाटील यांनी आभार मानले.

माध्यमांच्या महसुलावर परिणाम
‘‘कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे माहितीची किंवा बातम्यांची भूक कमी होणार नाही. मात्र लोक बातम्या कशा ग्रहण करतात, यात मोठा बदल होत आहे. डिजिटलचा विचार केला तर वाचक संकेतस्थळावर जाऊन बातम्या वाचत होते. आता ‘झिरो क्लिक’मुळे थेट ‘एआय’वरच माहिती मिळत असल्याने माध्यमांच्या महसुलावर परिणाम होत आहे,’’ असेही खांडेकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT