पुणे

ऊस प्लॉटची पाहणी

CD
अँकर --- धुळे : टुडे पान३ साठी... --- फोटो क्रमांक : 35005 सुरपान (ता. साक्री) : यूकी एआय आधारित ३१०२ ऊस वाणाच्या प्लॉटची पाहणीवेळी श्रीकला. शेजारी एस. मनीषा, जगदीश पाटील, सर्जेराव गांगुर्डे, शेतकरी आदी. --- सुरपानमध्ये ‘यूकी एआय’ ऊस प्लॉटची पाहणी आधुनिक तंत्रज्ञानाची शेतीला जोड; उत्पादनात होणार वाढ सकाळ वृत्तसेवा साक्री, ता. १४ : शेवरे (जि. नाशिक) येथील द्वारकाधीश साखर कारखान्याच्या तालुक्यातील दहिवेल विभाग कार्यक्षेत्रातील सुरपान (ता. साक्री) येथील शेतकरी प्रकाश भिका पाटील यांच्या शेतातील सुरू असलेल्या हंगामातील ‘३१०२’ या ऊस वाणाच्या प्रयोगात्मक ‘यूकी एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित) प्लॉटची तज्ज्ञांकडून नुकतीच पाहणी करण्यात आली. या दौऱ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आधुनिक शेतीविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. य प्रसंगी बेंगळुरू (कर्नाटक) येथील फार्मिटोपिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सह-संस्थापक श्रीकला, वरिष्ठ कृषीशास्त्रज्ञ एस. मनीषा आणि कंपनीचे इतर अधिकारी उपस्थित होते. पाहणीदरम्यान पाण्याचे व खतांचे अचूक नियोजन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, यावर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. ‘३१०२’ या वाणाची जोमदार वाढ पाहून आगामी काळात एकरी उत्पादनात निश्चितच वाढ होईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठी हा प्रयोगात्मक प्लॉट मार्गदर्शक ठरणार असून, प्रगतिशील शेतीच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या नियोजनासाठी कृषी सल्लागार जगदीश पाटील, समन्वयक सर्जेराव गांगुर्डे, ऊस विकास अधिकारी हेमंत खैरनार, ऊस विकास अधिकारी प्रकाश घरटे, बापू साबळे, चेतन गांगुर्डे यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: पंतप्रधान मोदींकडे डीके शिवकुमारांनी केली 'ही' मागणी; काँग्रेसमधूनच कडाडून विरोध; नेमकं काय घडलं?

बुधाच्या राशीबदलामुळे ५ राशींचे अच्छे दिन! नोकरीत प्रमोशन, व्यवसायात नफा अन् धनलाभाचे योग

"मी नाना पाटेकरांनाही मारेन..." 'लगान' फेम अभिनेत्याचा थेट दिलेला इशारा! नानांसोबत अनुभव सांगत म्हणालेले...

Latest Marathi News Live Update: रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीमध्ये वाद मिटेना, नेमकं काय घडतंय?

BEST Bus: हायकोर्टाचा विरोध, तरीही छठपूजेसाठी बेस्टच्या जुहू बीचसाठी जादा बस

SCROLL FOR NEXT