पुणे

‘एआय’चा वापर करणाऱ्या कंपन्यांना फायदा

CD

‘एआय’ प्रभावी वापरणाऱ्या
कंपन्यांनाच भविष्यात लाभ

‘मॅकिन्से’च्या संशोधन अहवालातील निष्कर्ष

नवी दिल्ली, ता. ९ (वृत्तसंस्था) : बहुतांश कंपन्या आता केवळ कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्यापुरत्या मर्यादित न राहता, संपूर्ण संस्थेमध्ये मूल्यनिर्मिती करण्यावर भर देत आहेत. यामुळे ‘एआय’ परिवर्तनाचा वेग वाढण्याची शक्यता असल्याचे ‘मॅकिन्से’च्या संशोधन अहवालात म्हटले आहे. नवी दिल्ली येथे प्रसिद्ध झालेल्या या अहवालानुसार स्पर्धकांपेक्षा वेगाने बदल स्वीकारणाऱ्या आणि जुळवून घेणाऱ्या संस्थाच ‘एआय’ क्षमतेचे रूपांतर शाश्वत व्यावसायिक मूल्यात करू शकतील, असा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे.

ज्या संस्था आपल्या कामकाजाच्या पद्धतीत ‘एआय’चा प्रभावीपणे समावेश करतील त्यांना भविष्यात मोठा फायदा होईल. केवळ वैयक्तिक उत्पादकता वाढवण्यावर भर देणाऱ्या संस्थांना ‘एआय’च्या माध्यमातून शाश्वत व्यावसायिक परिणाम मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो. ७५० कर्मचारी आणि नेत्यांच्या जागतिक सर्वेक्षणावर आधारित या अहवालात ‘एआय’ परिवर्तनाचे सक्षमीकरण, स्वयंचलन (ऑटोमेशन) आणि पुनर्निर्मिती असे तीन टप्पे सांगण्यात आले आहेत. सध्या बहुतांश संस्था पहिल्या दोन टप्प्यांवरच असून, केवळ ११ टक्के संस्था पुनर्निर्मितीच्या टप्प्यापर्यंत पोहोचल्या आहेत. सर्वेक्षणातील ७० टक्के कर्मचाऱ्यांनी आपण ‘एआय’ वापरण्यासाठी तयार असल्याचे सांगितले, मात्र केवळ २७ टक्के प्रमुखांना आपली संस्था या बदलासाठी सज्ज असल्याचे वाटते. वैयक्तिक तयारीपेक्षा संस्थात्मक सज्जता मूल्यनिर्मितीसाठी अधिक महत्त्वाची असल्याचे ‘मॅकिन्से’ला आढळले आहे. ज्या संस्थांनी आपल्या कामकाजाच्या पद्धतीत (वर्कफ्लो) बदल केले आहेत, त्यांना मूल्यनिर्मितीमध्ये ५.३ पटीने अधिक यश मिळाले आहे. केवळ कर्मचाऱ्यांचा वेग वाढवून व्यावसायिक प्रगती साधता येत नाही, तर मोकळा झालेला वेळ उच्च-मूल्य असलेल्या कामांकडे वळवणे आवश्यक आहे. अहवालानुसार, ‘एआय’बाबत साक्षर नेतृत्व आणि कर्मचाऱ्यांची क्षमता बांधणी अत्यंत महत्त्वाची आहे. ज्या कंपन्या ‘एआय’च्या भोवती आपली कामे, भूमिका अन् ‘ऑपरेटिंग मॉडेल’ची पुनर्रचना करतील, त्यांना भविष्यात मोठी संधी उपलब्ध होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SLC XI Warm up: बोटाला दुखापत झालेल्या शुभमन गिलचं मैदानात कमबॅक, आता पहिल्या कसोटीत खेळणार?

एकीकडे सुरु होती सर्जरी आणि दुसरीकडे गाणं गात होता सोनू निगम, संगीतावर प्रेम असावं तर असं! viral video

Thane News: ठाणेकरांच्या खिशाला कात्री! मालमत्ता कर तसेच टीएमटीचे तिकीट दरवाढ करण्याचा प्रस्ताव

मला मराठ्यांपासून लांब ठेवण्याचा पूर्वनियोजित कट; मनोज जरांगे आक्रमक, सरकारवर सडकून टीका

Marathi News Live Updates : माजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला, गाडीवर चिखल, पाण्याच्या बाटल्या आणि चपला फेकल्या

SCROLL FOR NEXT