teacher sakal
पुणे

विनाअनुदानित शिक्षकांचा तक्रार निवारणाचा मार्ग मोकळा

एआयसीटीईकडून नियामावली जाहीर; अपिलाचीही संधी उपलब्ध

सम्राट कदम

पुणे : विनाअनुदानित महाविद्यालयांतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रार निवारणासाठी प्रथमच रचनात्मक धोरण जाहिर करण्यात आले आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) यासंबंधीची नियमावली जाहीर केली असून, त्यानुसार संस्थास्तरावरच आता शिक्षक-शिक्षकेतरांना विविध तक्रारींसदर्भात न्यायाचा मार्ग मोकळा झाला आहे.

एआयसीटीईच्या ५३ व्या नियामक मंडळाने तक्रार निवारण समिती व अपिलीय समिती स्थापन करण्यास मान्यता देऊन अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. या मध्ये संस्थास्तरावरील तक्रार निवारण समितीची रचना, तक्रारीचे स्वरूप आणि तक्रार निवारणाबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच तक्रारदाराचे निवारण समितीच्या आदेशावर समाधान झाले नसेल तर तो अपिलीय समितीकडे अपिल करू शकतो, असेही नमूद केले आहे. संस्थास्तरावरील तक्रार निवारण समितीमध्ये संबंधित संस्थेचा प्राचार्य अध्यक्ष असणार आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाचे संबंधित विभागीय कार्यालयाचे सहाय्यक संचालक आणि मंडळाचे संबंधित विभागीय कार्यालयाचे सहाय्यक सचिव हे दोन सदस्य असतील. तसेच संबंधित संस्थेतील एक वरिष्ठ विभाग प्रमुख किंवा निवड श्रेणी अधिव्याख्याता सदस्य सचिव असणार आहे.

तक्रारीची प्रक्रिया...

- संबंधित संस्थेच्या प्राचार्यांकडे तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष म्हणून तक्रार सादर करावी.

- संस्थास्तरावरील तक्रारीचे निवारण १५ दिवसांच्या आत करावे

- समितीचा आदेश नसल्यास समितीच्या आदेशाची प्रत मिळाल्या पासून १५ दिवसात अपिलीय समितीकडे अपिल करावा

- समितीचे आदेश तात्काळ जारी करावेत व संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिद्धी दयावी

- अपिलीय समितीने ३० दिवसांच्या आत तक्रारीचे निवारण करावे

विनाअनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारींवर प्रथमतः संस्थास्तरावर कार्यवाही करण्यात यावी. त्यानंतर तक्रारदाराकडून अपिल प्राप्त झाल्यास त्यावर अपिलीय समितीमार्फत कार्यवाही करण्यात यावी. मंडळाकडे किंवा वरिष्ठ कार्यालयाकडे थेट तक्रार प्राप्त झाल्यास त्याबाबत कार्यवाही करण्यात येणार नाही.

- डॉ.विनोद मोहितकर, संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS ENG 4TH T20I: भारतीय संघ जिंकत नसेल तर...! पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यरचं मोठं विधान; म्हणाला, हे खेळाडू..

IND vs ENG 4th T20I : करावं तरी काय? भारतीय संघाचा लाजीरवाणा पराभव अन् इंग्लंडने जिंकली मालिका; गौतम गंभीर हतबल

IND vs ENG 4th T20I : भरवशाच्या म्हशीला टोणगा! भारताच्या फलंदाजांनी माती खाल्ली, श्रेयस अय्यरच्या खेळीने लाज वाचवली

Ashadhi Wari : आनंदोत्साहात पालखी सोहळा पुण्यनगरीमध्ये

IND vs ENG 4th T20I : पुन्हा तेच... वैभव सूर्यवंशी IPL समजून खेळायला गेला अन् जोफ्रा आर्चरने पुन्हा कार्यक्रम केला... Video

SCROLL FOR NEXT