corona.jpg 
पुणे

पुण्यातील लोकप्रतिनिधी-अधिकाऱयांना 'या' कारणामुळे कोरोनाचा संसर्ग 

सकाळवृत्तसेवा

पुणे : महापालिका असो अथवा शासकीय कार्यालये लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱयांत कोरोनाचा संसर्ग पसरण्यासाठी वातानुकूल यंत्रणा (एसी) कारणीभूत ठरत आहे. या बाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करायला हवे, असे विधान परिषदेतील आमदार डॉ. नीलम गोर्हे यांनी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या निदर्शनास सोमवारी आणले. तसेच महापालिकेत एसी वापरू नका म्हणून डॉ. गोऱहे यांनी आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशीही संपर्क साधला आहे. 

पुण्याच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा

लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱयांच्या व्हिडीआे कॉन्फरन्सिंगव्दारे झालेल्या बैठकीत डॉ. गोऱहे यांनी एसीबाबत सूचना केली. खासदार सुप्रिया सुळे, गिरीश बापट, वंदना चव्हाण, आमदार गोऱहे आणि चेतन तुपे या बैठकीत सहभागी झाले होते. पुण्याचे महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेत्या तसेच काही नगरसेवकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्र सध्या धास्तावले आहे. 

या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱहे यांनी, एसीबद्दलचा मुद्दा उपस्थित केला. महापालिका असो अथवा शासकीय कार्यालये, एसीचा वापर करू नका, असे आरोग्यमंत्री टोपे एक एप्रिलपासूनच सांगत आहेत. परंतु, अनेक ठिकाणी शासकीय कार्यालयांत एसी सध्या सुरू आहे. त्यातूनच त्याचा संसर्ग पसरत आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. खासदार सुळे यांनीही प्रत्येक बैठकीला लोकप्रतिनिधींना उपस्थित राहत येत नाही. त्यासाठी त्यांना व्हिडीआे कॉन्फरन्स, गुगल मीट किंवा हॅंगआऊटद्वारे सहभागी करून घेता येईल, असे स्पष्ट केले. 

रुग्णालयांत रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत, रुग्णवाहिका वेळेवर येत नाहीत, आदी मुद्दे खासदार बापट यांनी मांडले. संसर्ग झालेल्या नागरिकांना कोणत्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला द्यायचा, हे सध्या समजत नाही. त्यातून नागरिकांची फरफट होत असल्याचा मुद्दा डॉ. गोऱहे, तुपे यांनी मांडला. त्यावर डॉ. म्हैसेकर यांनी रुग्णालयांतील रुग्णसंख्या, उपलब्ध बेडस यांची माहिती असलेला तक्ता दररोज सायंकाळी चार वाजता सर्व लोकप्रतिनिधींना व्हॉटसअपवर पाठविला जाईल, याची ग्वाही दिली. तसेच या बाबतची माहितीही वेळवेर देण्यात येईल, असे स्पष्ट केले. 

क्वारंटाईन सेंटरमध्ये रुग्ण पोचल्यावर त्याला माहिती कशा पद्धतीने द्यायची, यासाठी व्हिडीआे क्लिप तयार करा, अशी सूचना खासदार चव्हाण यांनी केली. त्या बाबत तातडीने अंमलबजावणी करू, अशी ग्वाही डॉ. म्हैसेकर यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kini Toll Plaza Traffic : ‘फास्टॅग’ स्कॅनिंगला विलंब, किणी टोलनाक्यावर पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा; पुणे बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी

Rajgad ST Bus: राजगड तालुक्यात एसटीचा खोळंबा; बस बंद पडल्याने ८० प्रवाशांना चार तास ताटकळावे लागले

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या दोन वनडेत श्रेयस अय्यर कर्णधार; शुभमन गिल-गौतम गंभीर का नसणार संघात?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणाचे बीड कनेक्शन; शिरूरच्या प्रकाश मिसाळला अटक, आरोपींची संख्या १८ वर

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

SCROLL FOR NEXT