Air-India
Air-India 
पुणे

एअर इंडियाच्या प्रवाशांचा खोळंबा

सकाळवृत्तसेवा

पुणे - एअर इंडियाची गोव्याला जाणारी दोन विमाने रद्द झाल्याने प्रवाशांना सोमवारी मनस्ताप सहन करावा लागला. विमानतळावर पोचेपर्यंत प्रवाशांना कोणतीही सूचना एअर इंडियाकडून देण्यात आली नसल्यामुळे प्रवाशांच्या संतापात भर पडली. 

लोहगाव विमानतळावरून दुपारी ११.३० वाजता सुटणाऱ्या उड्डाणासाठी आलेले प्रवासी चार वाजेपर्यंत विमानतळावर ताटकळत बसले होते. या काळात एअर इंडियाकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य झाले नसल्याचेही प्रवाशांनी सांगितले. याविषयी एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तांत्रिक अडचणींमुळे विमान रद्द करण्यात आल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

प्रवाशांची पर्यायी व्यवस्था न झाल्यामुळे अनेकजण निराश होऊन परत घरी आले, तर काही जणांना खासगी बसचा आधार घ्यावा लागला. गोव्यात सोमवारपासून भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (आयएफएफआय) सुरू झाला आहे. त्यासाठी अनेक कलावंत, समीक्षक, चित्रपटप्रेमी सोमवारी निघाले होते. 

तांत्रिक अडचणींमुळे विमान रद्द झाले, त्यामुळे आम्ही काही प्रवाशांची उद्याच्या फ्लाइटने जाण्याची व्यवस्था केली आहे. खोळंबलेल्या प्रवाशांना पाणी, जेवणाचीही व्यवस्था आमच्याकडून करण्यात आली होती.
- सुहास जाधव, अधिकारी, एअर इंडिया

सुरवातीला विमानाला पंधरा मिनिटे उशीर होईल असे सांगण्यात आले होते. परंतु, चार तासांनंतर ते रद्द झाल्याचे सांगण्यात आले. पर्यायी व्यवस्था दुसऱ्या दिवशी करण्यात येईल असे सांगण्यात आल्यामुळे आम्ही स्वतःच आमची व्यवस्था केली. कोणत्याही परिस्थितीत गोव्याला पोचावेच लागणार असल्यामुळे पुणे ते बंगलोर आणि बंगलोर ते गोवा या मार्गे आम्ही जात आहोत.
- प्रकाश मगदूम, प्रमुख, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT