पुणे

दिवाळीत पुण्यातील हवेचा दर्जा इतर शहरांच्या तुलनेत समाधानकारक

यावर्षी ऐन दिवाळीत इतर शहरांच्या तुलनेत पुण्यातील हवेचा दर्जा हा समाधानकारक राहिला. तर २०१९ नंतर प्रथमच यंदा दिवाळीत शहरातील हवेच्या गुणवत्तेची पातळी चांगली राहिली.

अक्षता पवार

पुणे - लक्ष्मीपूजन, नरकचर्तुदशीच्या दिवशी मुंबई, दिल्ली आणि अहमदाबाद या शहरांच्या तुलनेत पुण्यातील हवा स्वच्छ राहिल्याचे, भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) ‘सफर’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. अर्थात त्या दिवशी पुणेकरांनी शोभेच्या दारूची आतषबाजी कमी केल्याचा सकारात्मक परिणामही शहरातील हवेवर झाला.

या वर्षी ऐन दिवाळीत इतर शहरांच्या तुलनेत पुण्यातील हवेचा दर्जा हा समाधानकारक राहिला. तर २०१९ नंतर प्रथमच यंदा दिवाळीत शहरातील हवेच्या गुणवत्तेची पातळी चांगली राहिली. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून शहरात ढगाळ हवामान कायम आहे. त्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (ता. ४) शहर व परिसरात रात्री पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहरातील हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक हा ८७ होता. मुंबई येथे हवेची पातळी मध्यम स्वरूपाची असून हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक हा १६२ होता. तर, दिल्ली येथे हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक हा ४५० पेक्षा जास्त नोंदला गेल्याने येथील हवेचा दर्जा अतिशय वाईट श्रंणीत पोचला. त्यानंतर शुक्रवारी (ता. ५) मुंबई आणि दिल्ली येथील हवेचा दर्जा आणखीन घसरला, मात्र पुण्यातील हवेची गुणवत्ता ही समाधानकारक श्रेणीवर कायम होती.

सफरच्या माध्यमातून पुणे, मुंबई, अहमदाबाद आणि दिल्ली या चार शहरांच्या हवेच्या गुणवत्तेची नोंद केली जाते. शहरातील विविध भागांमध्ये अतिसूक्ष्म धूलिकण (पीएम २.५), सूक्ष्म धूलिकण (पीएम १०), कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड सारख्या प्रदूषकांची नोंद केली जाते. तर लक्ष्मीपूजना दिवशी झालेला पाऊस आणि शोभेच्या दारूच्या आतषबाजीचे घटलेले प्रमाण, घटलेली वाहतूक आदी कारणांमुळे पीएम २.५ या प्रदूषकाचे प्रमाण कमी झाले, असे सफरच्या शास्त्रज्ञांनी सांगितले.

अहवालातील ठळक बाबी -

- ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात होणारी वाढ आणि शहरात वाहणाऱ्या वाऱ्यांसोबत प्रदूषके ही वाहून गेले

- पावसामुळे प्रदूषके धुवून निघाल्याने हवेचा दर्जा सुधारला

- शोभेच्या दारूची आतषबाजी घटली, वाहतूक कमी झाली, त्यामुळेही हवेचा दर्जा चांगला राहिला

- शिवाजीनगर आणि भोसरी हे पुण्यातील सर्वाधिक प्रदूषित क्षेत्र म्हणून शुक्रवारी पहाटे (ता. ५) नोंदले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT