पुणे

पुणेकरांनो, हवेची गुणवत्ता काय हे जाणून घ्यायचंय? मग हे वाचा!

सकाळवृत्तसेवा

पुणे : देशातील चार प्रमुख महानगरांच्या हवेतील गुणवत्ता काढणाऱ्या 'सफर' या हवामान प्रणालीनुसार पुण्यातील हवेची गुणवत्ता चांगल्या श्रेणीची नोंदली गेली आहे. प्रदूषणातील घटक म्हणून ओळखले जाणारे अतिसूक्ष्म धूलिकणचे (पीएम 2.5) प्रमाण सफरच्या इतर शहरांच्या तुलनेत सलग चार दिवसांपासून कमी असल्याचे दिसून आले.

सफरच्या माध्यमातून दिल्ली, मुंबई, पुणे आणि अहमदाबाद या चार प्रमुख शहरांच्या हवेची गुणवत्ता नोंदली जाते. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात या चारही शहरातील हवेची गुणवत्ता चांगल्या श्रेणीची नोंदली गेली. तसेच या काळात नायट्रोजन ऑक्साईड व सूक्ष्म धूलिकणसारख्या प्रदूषणातील घटकांमध्ये सुद्धा घट झाल्याचे दिसून आले होते. परंतु लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मात्र हवेची गुणवत्ता ही चांगल्यावरून समाधानकारक श्रेणीवर आली. तर गेल्या चार दिवसांच्या आकडेवारीनुसार शहराच्या हवेची गुणवत्ता सफरच्या इतर तीन शहरांच्या तुलनेत उत्तम असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, दिल्ली व अहमदाबाद येथील हवेची गुणवत्ता गेल्या दोन दिवसांपासून समाधानकारक दर्शविण्यात येत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'सफरद्वारे घेण्यात आलेल्या निरीक्षणातून असे स्पष्ट झाले आहे की पुण्यातील हवेची गुणवत्ता सर्वात चांगली असून, शहरात ढगाळ वातावरण तसेच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे अतिसूक्ष्म धुलिकणाचे प्रमाण कमी होत आहे. तसेच सातत्याने पावसाच्या सरी पडत राहिल्या तर हे प्रदूषणातील घटक त्यामुळे वाहून जातात. मात्र, पाऊस पडला नाही तर प्रदूषणातील घटक तसेच हवेत राहतात व त्यामुळे गुणवत्तेत ही परिणाम आढळून येतो."

- डॉ. गुफ्रान बेग, शास्त्रज्ञ - आयआयटीएम

सफरच्या आकडेवारीनुसार विविध शहरातील अतिसूक्ष्म धूळीकण (पीएम 2.5 ची नोंद 25 जुलै रोजी) 

- प्रमाण मायक्रोग्राम प्रति क्यूबिक घन मीटर (µg/m3) 

शहर : पीएम 2.5
दिल्ली : 30
पुणे : 16
मुंबई : 23
अहमदाबाद : 34

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT