Rashmi and Uddhav Thackeray
Rashmi and Uddhav Thackeray Google file photo
पुणे

CM ठाकरेंच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, एकजण पोलिसांच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयी समाजमाध्यमावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पत्नीबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण (Facebook post) केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी (Police) एका व्यक्तीला ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेला व्यक्ती हा एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याबद्दलही आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या दोघांविरुद्धही सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Airport police arrested one for posting an offensive post on Fb about CM Uddhav Thackerays wife)

राजेंद्र पंढरीनाथ काकडे (वय 52, रा. वडगाव शिंदे, हवेली) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काकडे हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्याने 7 मे रोजी फेसबुकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह लिखाण केले होते. त्यानुसार त्याच्याविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. काकडे याचे स्टेशनरीचे दुकान आहे. त्याने घटनात्मक पदाचा आणि प्रतिष्ठित राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या लौकिकास बाधा आणणारे कृत्य जाणून-बुजून केले आहे. त्यामुळे त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील आठवड्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलही फेसबुक, ट्‌विटर, इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह आणि बदनामीकार मजकूर टाकणाऱ्या 13 जणांविरुद्ध सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन एकास अटक केली होती.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयी समाजमाध्यमावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मोहसीन शेख आणि शिवाजीराव जावीर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे सोशल मिडिया सेलचे शहर संयोजक विनित वाजपेयी यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली होती. शेख आणि जावीर यांनी समाजमाध्यमांवर मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला होता. त्यांच्या छायाचित्रात काही फेरफार करण्यात आला होता, असे वाजपेयी यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. शेख एका राजकीय पक्षाच्या युवक आघाडीशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मोदींनी डोळा मारलाय, पण मी जाणार नाही'', उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना चिमटा

Raj Thackeray : ''अजित पवारांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही'' राज ठाकरे पुण्यात नेमकं काय म्हणाले?

T20 WC 2024 : 24 मे पूर्वी चार दिवस आधी... बीसीसीआयचा मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना दिलासा

Sai Sudarshan GT vs CSK : साई सुदर्शनने केला मोठा विक्रम; सचिन तेंडुलकरलाही टाकलं मागं

GT vs CSK Live IPL 2024 : गुजरात टायटन्सने सीएसकेला दिले 232 धावांचे आव्हान

SCROLL FOR NEXT