आळेफाटा ता. ३ ः पुणे येथे आयोजित एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या (एमआयटी-डब्लूपीयू) १५ व्या भारतीय छात्र संसदेत आळेफाटा (ता. जुन्नर) येथील ऐश्वर्या आशा उदयानंद पुरी हिने ‘आरक्षण आणि संविधान’ या विषयावर आपले विचार मांडले. ‘द भारत कोलोक्वियम’ या विशेष सत्रात देशभरातून उपस्थित विचारवंत, प्रशासक, पत्रकार व लाखो विद्यार्थ्यांसमोर केलेल्या या प्रभावी मांडणीमुळे जुन्नरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.
ऐश्वर्याने आपल्या भाषणात आरक्षणाच्या घटनात्मक मर्यादा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा संदर्भ, तसेच सामाजिक न्याय आणि घटनात्मक संतुलन यांचा सखोल ऊहापोह केला. ५० टक्क्यांपलीकडे जाणारे आरक्षण संविधानाच्या मुलभूत तत्त्वांना बाधा पोहोचवू शकते, असा मुद्दा मांडताना तिने समता, न्याय आणि प्रतिनिधित्व या मूल्यांचा संतुलित विचार मांडला.
भारतीय छात्र संसद हे व्यासपीठ देशभरातील युवकांना राष्ट्रीय राजकारणात प्रत्यक्ष सहभागाची संधी उपलब्ध करून देणारे एक व्यासपीठ म्हणून ओळखले जाते. या व्यासपीठावर माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम ते रामनाथ कोविंद अशा अनेक मान्यवरांनी तरुणांना दिशादर्शन केले आहे. यंदाच्या अधिवेशनात केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर, शाहीद सिद्दीकी, डॉ. संदीप पाठक, ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई, विजेंद्र गुप्ता, दिग्विजय सिंह तसेच शिक्षणतज्ज्ञ राहुल कराड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.