पुणे

गोडोलीनाका ते अजंठा चौक रस्‍त्‍यावर वाहतुक शाखेचे लक्ष

CD

अजंठा चौक रस्‍त्‍यावर
वाहतूक शाखेचे लक्ष

सातारा, ता. २७ : शहराच्‍या विविध भागांतील चौक अतिक्रमणमुक्‍त करण्‍यासह वाहतुकीचे नियोजन करण्‍यासाठी शहर वाहतूक शाखा तसेच सातारा पालिका सक्रिय झाली आहे. शहर वाहतूक शाखेने गोडोली नाका ते अजंठा चौक या रस्‍त्‍यावर लक्ष केंद्रित केले असून, या मार्गावर अस्‍ताव्‍यस्‍त थांबणाऱ्या वाहनधारकांना सूचना करत वाहतुकीचे नियम पाळण्‍याचे आवाहन सुरू केले आहे.
गोडोली नाका ते अजंठा चौक हा मार्ग रहदाराची असून, त्‍यावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. या मार्गावर वेगवेगळ्या वाहनांची दुरुस्ती करणारी गॅरेज तसेच वाहन विक्रीची शोरूम देखील आहेत. या गॅरेज तसेच इतर ठिकाणी येणारी वाहने रस्‍त्‍याकडेलाच अस्‍ताव्‍यस्‍त थांबलेली असतात. यामुळे मुख्‍य मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना अनेकदा त्‍यांचा अडथळा होता. हे लक्षात आल्‍यानंतर शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक राजेंद्र माने यांनी या भागाची कर्मचाऱ्यांसमवेत पाहणी केली.
पाहणी करत असतानाच त्‍यांनी गॅरेज तसेच वाहन विक्री करणाऱ्यांना वाहने रस्‍त्‍याकडेला उभी न करता इतर वाहनांना धोका होणार नाही, अशा पद्धतीने सुरक्षित उभे करण्‍याच्‍या सूचना केल्‍या. सूचना करताना वाहतुकीच्‍या नियमांचे पालन करण्‍याचे तसेच रस्‍त्‍याकडेला असणाऱ्या मोकळ्या जागेवर व्‍यावसायिक साहित्‍य न ठेवण्‍याचे आवाहनही केले. सूचना करूनही परिस्‍थितीत बदल न झाल्‍यास आगामी काळात कारवाई करण्‍याचा इशाराही त्‍यांनी या वेळी दिला. गेल्‍या काही दिवसांपासून वाहतूक शाखेने राबविलेल्‍या उपक्रमांमुळे वाहतुकीची कोंडी कमी होण्‍यास मदत झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Update : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू, 4 जण सुरक्षित; मंत्री शंभूराज देसाईंनी दिली महत्त्वाची अपडेट

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

Sunetra Pawar: चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार आक्रमक; आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्याची ग्वाही

Marathi News Live Updates : कोल्हापुरातील रस्त्यांची चाळण, ठाकरे गटाकडून खड्ड्यांमध्ये झाडं लावणार

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

SCROLL FOR NEXT