पुणे

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी डॉ. अजिंक्य शहा यांची निवड

CD

सोमेश्वरनगर, ता. २ : करंजेपूल (ता. बारामती) येथील डॉ. अजिंक्य सचिन शहा या एमबीबीएस झालेल्या विद्यार्थ्याची पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी (पीजी) दिल्लीच्या सेनादलाच्या बेस हॉस्पिटलमध्ये निवड झाली आहे. वैद्यकीय शिक्षणातील सर्वोच्च संस्थेत प्रवेश मिळविणारा अजिंक्य हा पंचक्रोशीतील पहिलाच विद्यार्थी ठरला आहे. दरम्यान, शहा कुटुंबात सलग तिसऱ्या पिढीतील एमबीबीएस होण्याचा मानही त्याने मिळविला आहे.
डॉ. अजिंक्यचे आजोबा स्व. डॉ. सुभाष शहा हे सोमेश्वरनगर परिसरातील पहिले एमबीबीएस डॉक्टर होते. १९७२ पासून २०२२ पर्यंत सेवा दिली होती. अजिंक्यचे वडीलही एमबीबीस झाले आणि करंजेपूलसारख्या ग्रामीण भागातच सेवा दिली. आजही या भागाच्या सेवेत ते एकमेव एमबीबीएस आहेत. यानंतर सलग तिसऱ्या पिढीत डॉ. अजिंक्यने नुकतीच डी. वाय. पाटील मेडीकल कॉलेजमधून प्रथम श्रेणीत एमबीबीएस पदवी प्राप्त केली आहे. एम. डी. या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी विविध परीक्षा दिल्या होत्या. यामधून त्याची कान नाक घसा तज्ज्ञ या पदव्युत्तर शिक्षणासाठी दिल्ली येथील सेनादलाच्या बेस हॉस्पिटलसाठी निवड झाली आहे. यासाठी देशभरातून अकरा डॉक्टरांचीच निवड होत असते. तो विद्या प्रतिष्ठानच्या सोमेश्वर इंग्लिश मीडियमचा विद्यार्थी आहे. या यशाबद्दल त्याचा मु. सा. काकडे महाविद्यालय, विद्या प्रतिष्ठान, बारामती सराफ असोसिएशन, करंजेपूल ग्रामस्थ आदींच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT