पुणे

प्रचारासाठी निघालेले कार्यकर्ते पोहोचले मात्र अंत्यदर्शनाला

CD

वडगाव निंबाळकर, ता. २८ : जिल्हा परिषद निवडणूक प्रचार टिपेला पोहोचला असल्याने आणि आज अजितदादा तालुक्यात येणार असल्याने सकाळी सकाळी कार्यकर्ते घराबाहेर पडले होते आणि प्रचाराला निघाले होते. पण, नऊच्या दरम्यान सोशल मीडियावर अजितदादांच्या अपघाताच्या बातम्या पडू लागल्या आणि टिपेला पोहोचलेला प्रचार जाग्यावरच थांबला. अफवा असेल म्हणून प्रत्येकाने खातरजमा केली. पण, वास्तव कळाले आणि प्रचारासाठी जमलेले कार्यकर्ते भावनिक होऊन बारामतीत अंत्यदर्शनाला पोहोचले.
निंबूत- कांबळेश्वर आणि वडगाव निंबाळकर- मोरगाव या दोन गटांतील कार्यकर्ते अजितदादांच्या आजच्या करंजेपूल येथे होणाऱ्या सभेची तयारी करत होते. दादा येणार म्हणून सगळे आज प्रचारासाठी सकाळपासूनच झटून बाहेर पडले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वडगाव निंबाळकर येथील कार्यालयात आणि करंजेपूल येथील कार्यालयात करण खलाटे, रोहिणी कदम, जितेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते एकत्र आले होते. मतदारांच्या घरोघरी गाठीभेटी घेण्याचे नियोजन होते. परंतु, अचानक विश्वास बसणार नाही अशा बातम्या येत असल्याचे पाहून सर्वच आवाक झाले. काही काळ हा प्रकार मॉकड्रीलसारखा असेल, अशी भावना झाली. परंतु, खात्रीलायक माहिती मिळताच कार्यकर्त्यांच्या अश्रूंचे बांध फुटले. सर्वांनी बारामतीच्या दिशेने धाव घेऊन मिळालेल्या माहितीची खातरजमा केली. घटनास्थळी पोचल्यावर बंदोबस्तामुळे पुढे जाता आले नाही. वडगाव निंबाळकरचे सरपंच सुनील ढोले म्हणाले, ‘‘आज दादा येणार असल्याने उत्साह वाढला होता. सगळेच्या सगळे घराबाहेर पडले होते. पण प्रचाराऐवजी अंत्यदर्शनाला जावे लागल्याचे दुःख वाट्याला आले. नियतीने देणारा धक्का सहन होणारा नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Jafari Iran strategy: अली जाफरी कोण आहेत? इराणची कडवी झुंज! अमेरिका-इस्रायलसारख्या महाशक्तींचा विजय का अशक्य ठरतोय?

Supreme Court on Menstrual Leave : ...तर महिलांच्या करिअरवर परिणाम; मासिक पाळीच्या रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'मला इच्छा आहे परंतु मी प्रेग्नेट नाही' नीना गुप्ता यांचा खुलासा, म्हणाल्या...'गोड बातमी असावी असं वाटतं पण...'

IPL 2026 Marathi News: कदाचित महेंद्रसिंग धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा, तो पिवळ्या जर्सीत पुन्हा दिसणार नाही !

Student Emotional Story : 'आई-वडील या जगात नाहीत..', चिमुरड्याचे 'ते' शब्द ऐकून डोळ्यात येईल पाणी; शिक्षकानं त्याच्यासोबत जे केलं, ते पाहून तुम्हीही कराल सलाम!

SCROLL FOR NEXT