पुणे

अजित पवार यांच्या अपघाताचे सत्य लवकरच समोर येईल कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांचा विश्वास

CD

पुणे, ता. १६ ः दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला दहा महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. जनतेच्या मनातील संभ्रम दूर होण्यासाठी अपघाताचे सत्य लवकरात लवकर समोर आले पाहिजे. या अपघातामागील नेमके सत्य लवकरच सर्वांसमोर येईल,’’ असा विश्वास कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सोमवारी व्यक्त केला.
पुणे जिल्हा परिषदेत अजित पवार यांच्या अर्धपुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमानंतर भरणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘अजित पवार यांच्या अपघाताबाबत जनतेच्या मनात संभ्रम आहे. तो दूर होण्यासाठी सत्य समोर येणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनीही अपघाताचा चौकशी अहवाल लवकर जाहीर करण्याची मागणी केली आहे. अपघात असो किंवा दुर्घटना, त्यामागचे सत्य लवकरच सर्वांसमोर येईल.’’ नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे थकीत असल्याबाबत विचारले असता भरणे म्हणाले, ‘‘याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविला आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.’’
केंद्राकडून कमी मदत मिळाल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘‘राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मदतीचा हात आखडता घेतलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना संकटाच्या काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे आश्वासन दिले आहे. राज्याने तयार केलेला अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला आहे. केंद्राकडून शेतकऱ्यांना भरीव मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधींची लव्ह स्टोरी! पहिल्यांदाच खासगी गोष्ट केली शेअर; गर्लफ्रेंडला घेऊन 'त्याच' रेस्टॉरंटमध्ये गेले...

PCMC Politics : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच; सात जागांवर निष्ठावंतांना संधी देण्याची प्रदेशाध्यक्षांकडे मागणी

Pune News : स्ट्रेचरवरून राडारोडा नेणाऱ्या ठेकेदाराला २५ हजारांचा दंड; भवन विभागाकडून कारवाई

Ration Card Verification : वार्षिक उत्पन्न ६० हजारांपेक्षा अधिक असलेल्यांची तपासणी; स्वस्त धान्य घेणाऱ्या लाभार्थ्यांवर अन्नपुरवठा विभागाची नजर

IND vs NZ: 'आम्ही माणसं आहोत, मशीन नाही!', न्यूझीलंड दौऱ्यातील अडचणींवर उघडपणे बोलला श्रेयस अय्यर

SCROLL FOR NEXT