सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १६ ः बारामती येथे झालेल्या विमान अपघातात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा मृत्यू झाला होता. त्या अपघातासह अहमदाबाद येथील विमान अपघाताची एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्यूरो (एएआयबी) संस्थेमार्फत चौकशी करण्यात आल्याची माहिती हवाई वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी सोमवारी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राष्ट्रीय जनता दलाचे(आरजेडी) सदस्य मनोज झा यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
‘‘विमान अपघातांची पारदर्शकपणे चौकशी करण्याच्या अनुषंगाने ‘एएआयबी’कडे पुरेशी संसाधने आहेत. वरील दोन अपघातांची चौकशी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार करण्यात आली आहे,’’ असे नायडू यांनी नमूद केले. बारामती आणि अहमदाबाद येथील विमान अपघातांचे रहस्य अद्याप कायम आहे. या दोन्ही अपघातांचा तपास निश्चित प्रक्रियेनुसार केला जावा, अशी मागणी वैमानिक संघटनेने केली असल्याचा मुद्दा झा यांनी मांडला होता.
आखाती देशांतून दोन लाखांपेक्षा भारतीय परतले
दरम्यान पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांतून दोन लाख १९ हजार लोक मायदेशी परतले असल्याची माहिती नायडू यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. युद्ध आणि तणावामुळे भारतीय विमान कंपन्यांनी आतापर्यंत चार हजार ३३५ विमानांचे उड्डाण रद्द केले आहे. दुसरीकडे विदेशी विमान कंपन्यांनी एक हजार १८७ विमानांचे उड्डाण रद्द केले आहे. विमानांच्या संचालनात सुरक्षा हा सरकारचा सर्वोच्च प्राधान्यक्रम असल्याचे नायडू यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.