पुणे

तालमीतल्या पैलवानाचा नाद करू नये; अजित पवारांच्या बॅनरची चर्चा

सकाळ डिजिटल टीम

पुणे - अजित पवार समर्थकांनी पुण्यात बॅनरबाजी केली असून जत्रेत खेळणाऱ्यांनी तालमीतल्या पैलवानांचा नाद करू नये असं यामध्ये म्हटलं आहे. गेल्या काही महिन्यात अजित पवार यांच्यावर किरिट सोमय्या यांच्याकडून सातत्यानं गंभीर असे आरोप केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा बोर्ड लावला असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच समझने वालों को इशारा काफी है असंही त्यावर म्हटलं आहे.

पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात अजितदादांच्या हातात तलवार असलेले बॅनर लावण्यात आले आहेत. नगरसेवक युवराज बेलदरे यांनी हे बॅनर लावले असून त्यांनी अजित दादांचे समर्थन केलंय. या पोस्टरवर "समझने वालों को इशारा काफी है" असं लिहिलं आहे. तसंच "जत्रेत खेळणाऱ्या पैलवानांनी तालमीकडे खेळणाऱ्या पहिलवानचा नाद करू नये" असा मथळा यावर आहे.

महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे बॅनरबाजी?

सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर चर्चेत राहण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून बॅनरबाजी केली जात असल्याचं म्हटलं जात आहे. हे बॅनर लावण्यासाठी संबंधित नगरसेवकांनी परवानगी घेतलीय का असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसंच बॅनग अनधिकृत आहे का यावर महापालिकेकडून कोणतीही माहिती मिळाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; १० जिल्ह्यांना IMDचा रेड अलर्ट, पुढील ४८ तास अतिवृष्टीचा धोका

Commonwealth Games 2026: भल्याभल्यांना टक्कर दिली, भारताची २० वर्षांची वाघिण जगाला भिडली! कोण आहे मार्टिना देवी मैबाम? थोडक्यात हुकले पदक

Karnataka HIV student: कर्नाटकमध्ये खरंच सात हजार विद्यार्थ्यांना HIV लागण? 'एड्स प्रिव्हेंशन सोसायटी'कडून अधिकृत निवेदन जारी

Commonwealth Para Athletics: तोरणडोंगरीच्या जिल्हा परिषद शाळेतील दिलीप गावितची ग्लास्गो राष्ट्रकुल पॅरा अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्णभरारी

Ambad Vegetable Market: अंबडच्या आठवडी बाजारात पावसाने भाजीपाल्याची मोठी नासाडी; शेतकरी‑विक्रेते बेभाव विक्रीला मजबूर

SCROLL FOR NEXT