कुरकुंभ, ता. २८ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच कुरकुंभ (ता. दौंड) परिसरासह संपूर्ण दौंड तालुक्यात मोठी शोककळा पसरली. ही बातमी समजताच सर्वसामान्य नागरिक, कार्यकर्ते व ग्रामस्थांमधून दुःख व्यक्त करण्यात येत होते.
अजित पवार यांनी जिल्ह्याच्या, तसेच ग्रामीण भागाच्या विकासासाठी केलेले भरीव कार्य सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आजही जिवंत असल्याच्या भावना व्यक्त केल्या जात होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात अनेक विकासकामांना गती मिळाली असून, त्यांच्या जाण्याने जिल्ह्याच्या विकासाला मोठी खीळ बसल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत होती. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर कुरकुंभ परिसरातील व्यापारी व व्यावसायिकांनी आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवले, तसेच प्राथमिक शाळा, हायस्कूल व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.