नसरापूर, ता. २९ : पालकमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूने नसरापूर व परिसर शोकसागरात बुडाला होता. नसरापूर व्यापारी असोसिएशन व नसरापूर ग्रामस्थ यांनी कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी उभे असलेल्या सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचार बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली.
पवार यांच्या मृत्यूमुळे शिवसेनेचे कुलदीप कोंडे, उद्धव ठाकरे, शिवसेनेचे ज्ञानेश्वर शिंदे, भाजपचे पोपट सुके, राष्ट्रवादीचे विक्रम खुटवड, रणजित शिवतरे, काँग्रेसचे सतीश चव्हाण, वैभव धाडवे तसेच अपक्ष लढणारे चंद्रकांत बाठे, जीवन कोंडे या सर्वांनीच प्रचार थांबवला.
नसरापूर येथे सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येत शोक व्यक्त केला. व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य हाडके यांनी बोलताना सांगितले, की महाराष्ट्र राज्याचे कणखर नेतृत्व आपल्यापासून हिरावले आहे. नसरापूर येथील सर्वच व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत.
यावेळी नसरापूर ग्रामस्थ, व्यापारी तसेच विविध पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
06152
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.