ajit pawar farmer allegation on Dadasaheb Kamble demand five lakh pune  esakal
पुणे

पाच लाखांची लाच मागितली! शेतकऱ्याने अजित पवारांसमोर मांडली व्यथा

दादासाहेब कांबळे यांनीही तातडीने भूसंपादन प्रक्रीयाच झालेली नाही त्या मुळे हा आरोपच चुकीचा असल्याचे अजित पवार यांना सांगितले

मिलिंद संगई, बारामती

बारामती - स्वत:च्या गावातच दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच एका ग्रामस्थाने थेट उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्यावर कामासाठी पैसे मागितल्याचा आरोप केला आणि काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काटेवाडी येथे एक तास राष्ट्रवादी पक्षासाठी या उपक्रमाअंतर्गत स्वत: अजित पवार यांनीच आज वेळ देत लोकांचे म्हणणे ऐकून घेतले. लोकांशी चर्चा करत असतानाच एका शेतक-याने उभे राहत भूसंपादनाच्या कामामध्ये पोटहिस्से करुन दिले नाहीत, मुद्दाम अडथळे आणले, पाच लाखांची मागणी केली असा जाहिर आरोपच केला. थेटपणे झालेल्या या आरोपानंतर काही काळ वातावरणातही तणाव निर्माण झाला.

दादासाहेब कांबळे यांनीही तातडीने भूसंपादन प्रक्रीयाच झालेली नाही त्या मुळे हा आरोपच चुकीचा असल्याचे अजित पवार यांना सांगितले. अजित पवार यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर संबंधित शेतकरी अजित देवकाते यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आपल्या दोघांच नाव एकच आहे, मी इतक्या संयमाने बोलतो आहे, तुम्ही पण शांततेने घ्या, जे काही काम असेल ते मार्गी लावून देतो, असे सांगत या विषयावर पडदा पाडला.

नंतर झाली खमंग चर्चा.....

या प्रकाराची कार्यक्रमानंतर मात्र खमंग चर्चा झाली. अनेकांकडून अनेक सुरस कहाण्या सांगितल्या गेल्या. दादांनी कडक भूमिका घ्यायलाच हवी अशीही मागणी काही ग्रामस्थांनी केली. प्रशासकीय भवन येथे अनेक कार्यालयात दलालांचा वावर आणि होणारी अडवणूक या बाबतही आता अजित पवार यांच्याकडेच तक्रारी करणार असल्याचे ग्रामस्थांनी बोलून दाखविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Satara MLC Result : सांगली-साताऱ्यात जयंत पाटलांना मोठा धक्का! भाजपच्या धैर्यशील कदमांनी शरद पवार गटाचा गेम उलटवला; पाहा किती मतांनी केला पराभव

Maharashtra Legislative Council Results : महायुतीचा विधानपरिषदेत दणदणीत विजय; ११ पैकी १० जागा खिशात, नाशिकमध्ये अपक्ष गितेंनी दिला धक्का

Gold-Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात एकाच दिवशी प्रचंड उसळी; चांदी तब्बल 4,000 ने महागली, सोन्याचा काय भाव? पाहा तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

Yashasvi Jaiswal: तंबूत राहणाऱ्या मुलाने वडिलांना दिली 1.32 कोटींची कार; यशस्वी जैस्वालची ही भेट पाहून तुम्हीही भावूक व्हाल!

Latest Marathi News Live Update : अमरावती विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे प्रवीण पोटे सलग तिसऱ्यांदा विजयी

SCROLL FOR NEXT