ajit pawar get angry over spreding wrong news politics esakal
पुणे

Ajit Pawar : एखाद्याच्या मागे लागायचे तर किती लागायचे...अजित पवार वैतागले...

काहीही झाले की अजित पवार नॉट रिचेबल असतात, असच दाखवले जाते, मलाही माझे काही पूर्वनियोजित कार्यक्रम असतात

मिलिंद संगई, बारामती

बारामती - राजकारणात आल्यानंतर खरतर लाईमलाईटमध्ये राहण्याची प्रत्येक राजकारण्याचीच इच्छा असते, अनेकदा पब्लिसिटीसाठी अनेक गोष्टी घडविल्याही जातात, मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बाबतीत मात्र सातत्याने येणा-या बातम्या त्यांच्यासाठी मनस्ताप देणारी बाब ठरत आहे.

गेल्या काही दिवसात माध्यमांनी ते भाजपमध्ये जाणारपासून ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असा कल्पनाविलास केल्यानंतर त्यांनी सकाळच्या दिलखुलास दादा या मुलाखतीतूनही आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र त्यावरही अजून काहीतरी घडतय अशाही बातम्या चालविल्या गेल्या.

आज बारामतीत झालेल्या मेळाव्यात अजित पवारांनी उद्विग्न होत एखाद्याच्या पाठीमागे किती हात धुवून लागायचे तर किती लागायचे असा सवाल केला. माझ्या भोवती कारण नसताना संशयाचे वलय निर्माण करण्याचे काम केले गेले, महाराष्ट्रात बाकी चौदा कोटी लोक असतानाच अजित पवारवरच इतक प्रेम का उतू चाललय, एवढा अजित पवार का आवडायला लागलाय...असा वैतागून प्रश्नच अजित पवारांनी विचारला.

काहीही झाले की अजित पवार नॉट रिचेबल असतात, असच दाखवले जाते, मलाही माझे काही पूर्वनियोजित कार्यक्रम असतात, ते कार्यक्रम रद्द करुन अचानक ठरलेल्या कार्यक्रमांना उपस्थित राहता येत नाही, दोन्ही बाजूंनी माझ्यावर टीका होते, आता काय अर्धा या कार्यक्रमला आणि अर्धा त्या कार्यक्रमाला जाऊ का मी...असा उद्विग्न प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT