Ajit Pawar esakal
पुणे

Vikas Lavande : अजित दादा हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष काढा

अजित पवार यांच्यामध्ये हिंमत असले तरी त्यांनी स्वतःचा पक्ष काढावा, तसेच त्यांची विचारसरणी हिंदुत्ववादी आहे की धर्मनिरपेक्ष हे जाहीर करणे आवश्‍यक आहे.

प्रशांत पाटील

पुणे - अजित पवार यांच्यामध्ये हिंमत असले तरी त्यांनी स्वतःचा पक्ष काढावा, तसेच त्यांची विचारसरणी हिंदुत्ववादी आहे की धर्मनिरपेक्ष हे जाहीर करणे आवश्‍यक आहे. शरद पवार यांना८३ व्या वर्षी पक्ष टिकविण्यासाठी निवडणूक आयोगाकडे लढायला लावणे हा कृतघ्नपणा आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत लवांडे बोलत होते.

लवांडे म्हणाल, ‘भ्रष्टाचार केला असावा म्हणूनच कारवाई टाळण्यासाठी अजित पवार आणि इतर नेते भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले असावेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांनी आम्ही हिंदुत्वासाठी भाजपसोबत आलो आहोत असे स्पष्ट करत विसारसणीसाठी बंद केल्याचे सांगितले. पण अजित पवार यांनी अद्याप त्यांची विचारसरणी कोणती हे जाहीर केलेले नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला या देशाचे संविधान मान्य नव्हते. हा पक्ष फॅसिस्ट विचारांचा आहे. सत्तेच्या माध्यमातूनच भाजप त्याच पद्धतीने काम करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसवर ७० हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप करताच पुढच्या तीन दिवसात अजित पवार व इतर नेत्यांनी राष्ट्रवादीत बंड केले. सीबीआय, ईडीचा वापर भाजपच्या एखाद्या सेल सारखा केला जात आहे. ज्या पद्धतीने शिवसेना फोडली तीच पद्धत राष्ट्रवादी फोडण्यासाठी वापरली आहे.

राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर स्वतःचा पक्ष काढला. त्याच प्रमाणे अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह सोडून द्यावे, शरद पवार यांचे नाव व फोटो वापरू नये आणि अजित राष्ट्रवादी काँग्रेस असा नवीन पक्ष स्थापन करावा, असा टोलाही लवांडे लगावला.

पक्ष फोडणारेच बडवे होते

शरद पवार यांना बडव्यांनी घेरले आहे असा आरोप केला जात आहे. पण जे नेते पवार यांना सोडून गेले तेच लोक त्यांच्या भोवती होते. त्यांच्या शिवाय साहेबांना भेटताही येत नव्हते. पक्ष फोडणारे नेतच बडवे आहेत, अशी टीका लवांडे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT