Pravin Mane sakal
पुणे

Indapur News : अजित पवार गटाला मोठा धक्का! प्रवीण माने शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार

पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने हे अजित पवारांच्या घड्याळाची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार.

संतोष आटोळे

इंदापूर - इंदापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसला असून पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने हे अजित पवारांच्या घड्याळाची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार आहेत. शनिवार (ता. 03) रोजी पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. यामुळे आगामी काळात इंदापूर मधील राजकीय गणिते बदलली जाण्याचे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी प्रवीण माने यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची धडाक्यात सुरवात केली होती. मात्र त्यानंतर काही दिवसातच त्यांनी पुन्हा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. या दरम्यानच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही माने यांच्या निवासस्थानी भेट दिली होती.

त्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये इंदापूर तालुक्यातील आमदार दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने यांचे सारखे दिग्गज नेते असतानाही सुप्रिया सुळे आघाडीवर राहिल्या. त्या नंतरच्या काळात प्रवीण माने यांचे नाव इंदापूर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाकडून अंतिम करण्यात आल्याची चर्चा होती.

यामुळे प्रवीण माने याचा प्रवेश केव्हा होणार याकडे नजरा होत्या. त्यानुरूप शनिवार (ता. 03) रोजी पुणे शहरातील निसर्ग मंगल कार्यालय येथे प्रवीण माने अजित पवारांच्या घड्याळाची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार आहेत. त्यामुळे इंदापूरच्या तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार पक्षाला मिळालेल्या यशानंतर पक्षाकडून विधानसभेच्या साठी जोरदार तयारी सुरू आहे. त्यानुरूप इंदापूर तालुक्यातील मोठे राजकीय प्रस्थ असलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने हे आमदार रोहित पवार आणि जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांच्या उपस्थितीत पुणे येथील निसर्ग कार्यालयात प्रवेश होणार आहे.

- महारुद्र पाटील, कार्याध्यक्ष इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT