ajit pawar -Chandrakant Patil Esakal
पुणे

Ajit Pawar: अजित पवारांना चलाख अन् धुर्त म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना राष्ट्रवादीचं उत्तर; म्हणाले...

चंद्रकांत पाटलांच्या विधानामुळं भाजपमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा सुरु आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी टिप्पणी करताना त्यांना चलाख आणि धूर्त म्हटलं होतं. त्यांच्या या विधानावरुन भाजपमध्ये अजितदादांविरोधात नाराजी असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पण पाटलांना आता अजितदादांच्या गटाना उत्तर दिलं आहे. (Ajit Pawar NCP reply to Chandrakant Patil who called Ajit Pawar clever Politition)

चंद्रकांत पाटील फस्ट्रेट झालेत

चंद्रकांत पाटलांच्या टिप्पणीवर बोलताना "पालकमंत्रीपद गेल्यामुळं चंद्रकांत पाटील फस्ट्रेट झाले असावेत, त्यामुळं त्यांनी अजितदादा यांच्याविषयी असं विधान केलं असेल," अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

नातेसंबंध जपले पाहिजेत

दरम्यान, दरसालप्रमाणं बारामतीतील काटेवाडी इथल्या शरद पवारांचं निवासस्थान गोविंदबागेतही अजित पवारांनी आज हजेरी लावली. यावरही मानकर यांनी प्रतिक्रिया दिली. म्हणाले, अजित पवार हे स्पष्ट वक्ते म्हणून ओळखले जातात आणि दिवाळीच्या सणात नातेसंबंध जपले पाहिजेत असंही मानकर यांनी म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासूनच शरद पवार आणि अजित पवार हे दिवाळीसाठी एकत्र येणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. सकाळी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला अजित पवार गैरहजर होते. मात्र, अजित पवार संध्याकाळी सहकुटुंब शरद पवार यांच्या बारामतीतील निवासस्थानी गोविंदबागेत दाखल झाले होते, यावरून चंद्रकांत पाटीलांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार राजकीय दृष्ट्या अतिशिय चतुर, चलाख आणि धूर्त आहेत. 'ते पोटात काय आहे ते ओठावर येऊ देत नाहीत', असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. अजित पवार दिवाळी स्नेहभोजनासाठी गोविंद बागेत शरद पवारांच्या घरी गेले. त्यावर वाडेश्वर कट्टयावर चंद्रकांत पाटलांना प्रश्न विचारला असता, पवार कुटुंब धूर्त असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT