ajit pawar esakal
पुणे

Pune : माझ्यावर अतिप्रेम करणारे संभ्रमाचे वातावरण तयार करतात; अजित पवार

पत्रकार परिषदेत खुर्च्याही मर्यादीत असतात, त्या मुळे साहेबांच्या सूचनेनुसारच आम्ही आमच्या कामाला गेलेलो होतो,

मिलिंद संगई, बारामती..

बारामती - ज्यांना माझे काम बघवत नाही, मी जे करतो त्या बद्दल ज्यांच्या मनामध्ये चुकीच काहीतरी असत, आमच्यावर अतिशय प्रेम करणारी जी लोक आहेत, तेच माझ्याबाबत संभ्रमाचे वातावरण तयार करतात, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

बारामतीत आज माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेला मी हजर नव्हतो कारण शरद पवार साहेबांनीच प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील व इतर काही मान्यवरांना पत्रकार परिषदेला यावे असे सांगितले होते,

पत्रकार परिषदेत खुर्च्याही मर्यादीत असतात, त्या मुळे साहेबांच्या सूचनेनुसारच आम्ही आमच्या कामाला गेलेलो होतो, त्या बाबतही विनाकारण बातम्या चालविल्या गेल्या. साहेबांनी जो आदेश दिला होता त्या नुसारच ठराविक लोक पत्रकार परिषदेला हजर राहिले, बाकीचे हजर राहिले नाही.

मुख्यमंत्री कर्नाटकात प्रचाराला गेल्याचे विचारले असता, ते कुठ गेले काय करतात या वॉचवर मी अजिबात नाही, मला त्याच्याशी काहीही देणघेण नाही, माझी कामे सुरु आहेत.

राज ठाकरे यांनी केलेल्या मिमिक्रीबद्दल विचारता अजित पवार म्हणाले, राज ठाकरे यांना मिमिक्रीशिवाय दुसर काय जमत, मिमिक्री करण हा त्यांचा जन्मसिध्द हक्क आहे, असे अजित पवार यांनी हसत हसत नमूद केले,

त्यांना जनतेने नाकारलेले आहे, स्वताःचा पक्ष वाढविण्याऐवजी अजित पवार यांच्यावर मिमिक्री करण व त्यांच व्यंगचित्र काढण यात त्यांना समाधान वाटत असेल आणि त्यातून त्यांना समाधान मिळत असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.

दरम्यान शरद पवार यांनी जी भूमिका मांडली तीच पक्षाची अंतिम भूमिका आहे, पवारसाहेबांच्या भूमिकेवर मी काहीही मत व्यक्त करणार नाही, असेही अजित पवार म्हणाले. त्यांच्या राजीनाम्याचा विषय आता संपलेला असून सर्वच जण आपापल्या कामाला लागलेले आहेत, त्या मुळे हा विषय काढून माझाही वेळ घेऊ नका व तुमचाही वेळ वाया घालवू नका, असा सल्लाच अजित पवारांनी माध्यमांना दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

आकाश पाळण्यात महिलेचे केसं अडकले, केसांसह चामडी निघाली; तांन्हा पोळ्याच्या यात्रेत थरारक घटना

Kaygaon News : गोदावरीत उडी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या अल्पवयीन मुलाचे पोलिसांनी वाचवले प्राण

Sangli Mahanagarpalika Bharti : महापालिकेत भरतीचा मार्ग मोकळा; टाटा कन्सल्टन्सीला दिला कंत्राटाचा कार्यादेश, 82 रिक्त पदांपैकी 41 पदांसाठी भरती

SCROLL FOR NEXT