Koregaon Bhima,ajit pawar,maharashtra
Koregaon Bhima,ajit pawar,maharashtra 
पुणे

कोरेगाव-भीमाच्या भूमीत अजित पवारांनी सांगितला महाविकास आघाडीचा संकल्प!

सकाळ ऑनलाइन टीम

पुणे :  कोरेगाव भीमा येथील जय स्तंभाला अभिवादन केल्यानंतर राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचा नव्या वर्षातील संकल्पही बोलून दाखवला. कोरोनामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. नऊ महिने वाया गेले. छोटे-मोठे उद्योजक असतील विकास कामाच्या बाबतीतील निर्णय असतील यावर योग्य तो निर्णय घेऊन राज्याचा आर्थिक गाडा पूर्वपदावर आणायचा आहे.

केंद्र सरकारकडून येणारा निधी अद्याप राज्याला मिळालेला नाही. परंतु  ऐकमेकांवर ढकलण्याऐवजी अर्थव्यवस्थेला गती देण्यावर भर देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असेल, राज्यातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करु, हाच महाविकास आघाडीचा संकल्प आहे, असे अजित पवारांनी यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार चांगले काम करत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. 

दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे कोरेगाव भीमा येथे कार्यक्रम पार पडलाय ऐतिहासिक लढाईत जे शूरवीर शहीद झाले त्यांना अभिवादन करण्यासाठी याठिकाणी आलो, असे अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. मधल्या काळामध्ये शौऱ्य गाथा  सांगणाऱ्या या कार्यक्रमाला गालबोट लागल्याा उल्लेखही त्यांनी केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने गर्दी टाळण्याचे आव्हान केले होते, त्याला नागरिकांनीही प्रतिसाद दिल्याचेही अजित पवारांनी सांगितले.

कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक स्तंभाला अभिवादन करण्याचा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी  राज्य सरकारने  कार्यक्रमाचे सह्याद्री वाहिनीवरुन थेट प्रसारण करण्याचा निर्णय घेतला होता. गर्दी टाळून नागरिकांनी घरातूनच अभिवादन करावे, असे अहवान करण्यात आले होते. नागरिकांनी याला प्रतिसादही दिला.   राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरेगाव भीमा येथे जाऊन परंपरेनुसार जयस्तंभाला अभिवादन केले. यावेळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह अन्य कार्यकर्तेही उपस्थितीत होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT