Ajit Pawar  Sakal
पुणे

Ajit Pawar : 'जिरायत' हा शब्द कायमचाच पुसणार - अजित पवार

" बारामती तालुक्यातील जिरायत हा शब्दच कायमचा काढून टाकणार आहे. संपूर्ण तालुक्याची ओळख बागायती म्हणून होईल.

विजय मोरे

उंडवडी : " बारामती तालुक्यातील जिरायत हा शब्दच कायमचा काढून टाकणार आहे. संपूर्ण तालुक्याची ओळख बागायती म्हणून होईल. यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. मात्र यासाठी जनतेने महायुतीचा उमेदवार निवडून देणे गरजेचे आहे". असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उंडवडी कडेपठार येथे व्यक्त केले.

उंडवडी कडेपठार ( ता. बारामती ) येथे सुनेत्रा पवार यांच्या लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने महायुक्तीच्या वतीने जाहिर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी झालेल्या सभेत श्री. पवार बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भरत खैरे, बारामती पंचायत समितीच्या माजी उपसभापती शारदा खराडे, निता बारवकर , नितीन सातव, ज्ञानेश्वर कौले, संभाजी होळकर, दिलीप खैरे, बाळासाहेब परकाळे, दिलीप परकाळे , सुहास काळे, दूध संघाचे संचालक सुशांत जगताप, दत्तात्रेय वावगे, विशाल गाडेकर, सरपंच रुपाली जराड , उपसरपंच समिर बनकर, जराडवाडीचे सरपंच रत्नदिप जराड आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजित पवार पुढे म्हणाले, " या निवडणुकीत आम्ही इंदापूरमध्ये मिळते जुळते घेतले आहे. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्रित आलो आहे. त्यामुळे गावागावातील कार्यकर्त्यानी देखील आपसात मधील मतभेद बाजूला ठेवून कामाला लागले पाहिजे.

ही निवडणूक महत्वपूर्ण आहे. त्यामुळे कोणीही भावनिक होवू नका. माझ्या कामाची पध्दत सर्वांना माहिती आहे. उंडवडी कप तील संत तुकाराम महाराज पालखीमहा मार्गाच्या पूलाचा विषय देखील लवकरच मार्गी लावला जाईल.

बारामती तालुक्यातील जिरायत हा शब्द कायमचा काढून टाकणार आहे. जनाई शिरसाई उपसा योजना क्षमतेने चालविण्यासाठी अनेक अडचणी आहेत. मात्र ही योजना सौर ऊर्जावर करणार आहे. सौरऊर्जेवर योजना केल्यानंतर शेतकर्यांवर पडणारा विजबिलाचा बोजा कमी होणार आहे. तसेच योजना बंद पाईपलाईन करुन शेतीला पाणी देण्याचाही माझा प्रयत्न आहे.

पुणेकरांना पिण्याचे कमी पडू नये, यासाठी मुळशीच्या टाटाच्या धरणातील पाणी पुणेकरांना देवून खडकवासला प्रकल्पातील पाणी इंदापूर , दौंड व बारामतीला या तालुक्यातील शेती मिळेल. यामुळे तीन तालुक्यातील शेती बागायती होण्यास मोठी मदत होणार आहे. या भागातील पाण्याचे प्रश्न कायमचे सोडविण्यासाठी केंद्रात मोदी साहेबांच्या विचाराचा प्रतिनिधी पाठवणे गरजेचे आहे.

गेल्या दहा वर्षात केंद्राचा निधी राज्याला मिळाला नाही. त्यामुळे यावेळी मात्र आपण महायुतीच्या वतीने सुनेत्रा पवार यांना निवडून द्यावे. म्हणजे राज्याला मोठा निधी मिळेल. मी या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानंतर बारामती तालुक्यातील एका एका गावात सात ते आठ कोटीचा निधी दिला आहे. "असेही यावेळी पवार यांनी आवर्जून नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास काळे व विशाल गाडेकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT