Ajit pawar  esakal
पुणे

Ajit Pawar : 'पिंपरी-चिंचवड पोट निवडणुकीत दोन व्यक्तींच्या नावांची चर्चा'

लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पिंपरीमध्ये पोट निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Pimpri Chinchwad By poll Election : पिंपरी-चिंचवडच्या पोट निवडणुकीबाबत विरोधा पक्ष नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा : जगायचं कसं हे सांगण्यासाठी हवं 'लिव्हिंग विल'

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर येथे पोट निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या जागेवर कोणता पक्ष कोणाला उमेदवारी देत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यातच विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी या जागेसाठी लक्ष्मण जगताप यांचा भाऊ आणि पत्नीच्या नावाची चर्चा असल्याचे म्हटले आहे.

मात्र, भापजपचा उमेदवार कोण हे माहिती नाही, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. देशात सध्या धर्मातलं अंतर वाढत चालली आहे. मात्र, कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असे वागू नये असे पवार म्हणाले.

याशिवाय महागाई आणि बेरोजगारीत प्रचंड वाढ झाली असल्याचेही पवार म्हणाले. कसब्यातून मुक्ता टिळक यांचे पती इच्छूक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या काळात कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी दिली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राष्ट्रवादीने कसली कंबर

चिंचवड विधानसभेसाठी राष्ट्रवादीने कंबर कसली असून कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जागा लढणार असल्याचे राष्ट्रवादीचे विठ्ठल काटे यांनी सांगितले. त्यासाठी चिंचवड मधील पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी बैठक घेवून विठ्ठल काटे यांना तिकीट मिळावे यासाठी पक्ष श्रेष्ठींकडे मागणी केली जाणार आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी लढवणार आहे.

या पोटनिवडणूकीत विठ्ठल काटे इच्छुक आहेत, २७ तारखेला निवडणूक असल्याने पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. आज चिंचवड पार्टी कार्यालयामध्ये पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची, नगरसेवकांची बैठक पार पडली या बैठकीत निर्णय झाला आहे की काहीही झालं तरी या जागेवर पक्षाने उमेदवार द्यावा अशी मागणी पक्ष श्रेष्ठींकडे केली जाणार आहे.

पक्षाकडे मागणी राहील की या ठिकाणी राष्ट्रवादीने उमेदवार द्यावा. भाजपने कोणालाही उमेदवारी दिली तरीही राष्ट्रवादीने या जागेवर उमेदवार द्यावा अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.

मात्र पक्ष जी भूमिका घेईल त्यानुसार काम केल जाणार आहे. पक्षाच्या विरोधात जावून कोणताही निर्णय इच्छुक उमेदवार म्हणून घेणार नाही अशी प्रतिक्रिया विठ्ठल काटे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT