कवठे येमाई, ता. २९ : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोचली असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याची बातमी धडकली. यामुळे संपूर्ण राजकीय वातावरणाला क्षणार्धात ब्रेक लागला. सर्वच पक्षांचे नियोजित प्रचार दौरे, सभा आणि बैठका तातडीने स्थगित करण्यात आल्या. ग्रामीण भागातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आणि सर्वत्र स्मशान शांतता पसरली.
सर्वत्र व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर आदी समाजमाध्यमांवर अजित पवार यांच्या जुन्या आठवणी, भाषणांचे व्हिडिओ, खुमासदार किस्से आणि छायाचित्रे मोठ्या प्रमाणावर शेअर करत हळहळ व्यक्त केली जात आहे. सर्वच पक्षांतील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांमध्ये शोकाकूल वातावरण निर्माण झाले. शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागात गावोगावी शोकसभा आयोजित करून स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.