dada-y.jpg 
पुणे

अजित पवारांनी पुण्यातील तळजाई वनउद्यान अन् 'या' रस्त्यांचा प्रश्न लावला मार्गी  

सकाळवृत्तसेवा

पुणे : पाचगाव-पर्वती येथील तळजाई वनउद्यानात निसर्ग पर्यटन विकास आराखड्यासाठी १३ कोटी रुपये उपलब्‍ध करुन दिले जातील, अशी माहिती उपमुख्‍यमंत्री व पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयात 'तळजाई वन उद्यान विकास आराखड्या'बाबत अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावोळी त्यांनी वरिल निर्णय जाहीर केला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, आमदार माधुरी मिसाळ, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्‍त आयुक्‍त रुबल अगरवाल, उपवन संरक्षक श्रीलक्ष्‍मी, नगरसेवक सर्वश्री आबा बागूल, आश्विनी कदम, सुभाष जगताप, माजी नगरसेवक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे जिल्‍ह्याच्‍या विकासकामांसाठी कोणतीही आडकाठी आणली जाणार नाही, असे स्‍पष्‍ट करुन अजित पवार यांनी पुणे शहराच्‍या दृष्टीने चांगल्‍या गोष्‍टी व्‍हाव्‍यात म्हणून पाचगाव-पर्वती या वनक्षेत्राचा निसर्ग पर्यटन आराखडा तयार करुन त्‍यास नागपूर येथील महाराष्‍ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाची मंजूरी घेतलेली आहे. या आराखड्यासाठी राज्‍य शासनाच्‍यावतीने १३ कोटी रुपये उपलब्ध करुन दिले जातील असे सांगितले.

यानंतर बैठकीत सेनापती बापट रोड ते पंचवटी पर्यायी रस्‍ता, मॉडर्न कॉलेज येथील पर्यायी रस्‍त्‍याबाबतही चर्चा झाली. यावेळी आमदार सिध्‍दार्थ शिरोळे, जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पुणे प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्‍त विक्रमकुमार, अतिरिक्‍त आयुक्‍त रुबल अगरवाल, उपवन संरक्षक श्रीलक्ष्‍मी, निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra drought-like situation: परतीचा पाऊस जोरदार पडून बळीराजाला दिलासा मिळू दे; महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचे गणरायाला साकडे

Champakali Recipe: गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा जिभेवर विरघळणारी खुसखुशीत 'चंपाकळी'!

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

SCROLL FOR NEXT