Ajit Pawar News Updates Ajit Pawar
पुणे

सक्शन यंत्रांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाटप

यामुळे सांडपाण्याची सुटणारी दुर्गंधी कमी होण्यास मदत होणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यातील १७ ग्रामपंचायतींना आणि एक भोर पंचायत समितीला अशा १८ गावातील ड्रेनेज (सांडपाणी नलिका) साफ करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या सक्शन यंत्रांचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते शनिवारी (ता.२६) वाटप करण्यात आले. या यंत्रांच्या खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीने निधी उपलब्ध करून दिला आहे. या यंत्रांच्या मदतीने गावातील सांडपाणी नलिका स्वच्छ करता येणार आहेत. यामुळे सांडपाण्याची सुटणारी दुर्गंधी कमी होण्यास मदत होणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी सांगितले.

या यंत्रांचे वाटप करण्याच्या कार्यक्रमप्रसंगी अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, कृषी सभापती बाबूराव वायकर, समाजकल्याण सभापती सारिका पानसरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे आदी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नावीन्यपूर्ण योजनेतून ग्रामपंचायतींना सक्शन यंत्र देण्याची योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रत्येकी ८ लाख ९० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचेही पानसरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

पहिल्या टप्प्यात अकरा तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींना या यंत्राचे वाटप करण्यात आले असून, यामध्ये वारूळवाडी, ओतूर, चिंबळी, चऱ्होली खुर्द, अवसरी बुद्रूक, निंबूत, भिगवण, अंथुर्णे, नीरा शिवतक्रार, रांजणगाव गणपती, हिंजवडी, भूगाव, कार्ला, कामशेत, इंदोरी, उरुळी कांचन, लोणी काळभोर आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या यंत्राची क्षमता ३ हजार लिटरची आहे. दरम्यान, भोर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना या यंत्राचा लाभ घेता यावा, यासाठी हे यंत्र तेथील पंचायत समितीला देण्यात आले आहे. ज्या ग्रामपंचायतींना हे यंत्र देण्यात आले आहे. त्या ग्रामपंचायती सातशे रुपये रोड, या भाड्याने शेजारील गावातील ग्रामपंचायतींना वापरासाठी यंत्र देऊ शकतात. तशी परवानगी दिली असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Accident: मुंबईत पुन्हा बेस्टचा अपघात! इलेक्ट्रिक बसच्या धडकेत २ जण जखमी; थरार CCTV मध्ये कैद, Video Viral

Kolhapur Theft Case : ‘पोलिसाच्या घरातील तिजोरी अर्धा किलोमीटर शेतात नेत फोडली; लक्ष्मी पूजनासाठी ठेवलेले पैसे चोरले, कोल्हापुरातील घटना

Chiplun Bribery Case : गरोदर महिलेकडून 4,500 रुपयांची लाच घेणाऱ्या 'त्या' महिला डॉक्टरचे होणार निलंबन? कोर्टाकडून जामीन मंजूर, पण नोकरी धोक्यात?

राज्यातील चार IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, विदर्भातील दोघांचा समावेश, तातडीने कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश

दत्तकपुत्र होता बॉलिवूडचा हा सुपरस्टार ! आईनेच काका-काकूंच्या केलं होतं स्वाधीन; मामाने बदललं आयुष्य

SCROLL FOR NEXT