पुणे

लॉकडाऊनबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा; पुण्यात कडक निर्बंध - उपमुख्यमंत्री पवार

पांडुरंग सरोदे@spandurangSakal

पुणे : पुण्यातील लॉकडाउनबाबत जो निर्णय असेल तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. परंतु पुण्यात रुग्णसंख्येत घट होत चालली आहे. त्यामुळे सध्या लॉकडाउनएवजी आणखी कडक निर्बंध लावण्यात येतील. तसेच, विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन आरोग्य विभागाने सतर्क राहावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

कौन्सिल हॉल येथे शुक्रवारी उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना उपाययोजनांबाबत आढावा बैठक पार पडली. त्यानंतर पवार म्हणाले, उच्च न्यायालयाने पुण्यात लॉकडाउन लागू करण्याबाबत राज्य सरकारला सूचना केल्या आहेत. त्यावर पुण्यात लॉकडाउन लागू करायचा की नाही, याचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे घेतील. नागरिकांनी स्वतःहून नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. रुग्णसंख्या अधिक असलेल्या भागात लॉकडाउनचा निर्णय घेण्याचे अधिकार प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार बारामतीमध्ये सात दिवसांसाठी लॉकडाउन करण्यात आला आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान बालके बाधित झाल्यास त्यांना आवश्यक उपचार वेळेत उपलब्ध करून द्यावेत. त्यासाठी योग्य नियोजन करावे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतील लॉकडाउनला नागरिकांनी प्रतिसाद दिला. परंतु यापूर्वीच्या लॉकडाउनमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. तसेच, उद्योग-व्यवसायांना फटका बसला आहे. त्यामुळे लॉकडाउनचा निर्णय घेण्यापूर्वी या सर्व बाबी पडताळून पाहणे गरजेचे आहे.

महापौरांनी न्यायालयात आकडेवारी द्यावी

"उच्च न्यायालयासमोर पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील कोरोना बाधितांची आकडेवारी एकत्रित दाखविण्यात आली. त्यामुळे रुग्णसंख्येच्या आकड्याचा फुगवटा दिसला. त्यामुळे न्यायालयाचे लॉकडाउनबाबत तसे मत झाले असेल. पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे, ही बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येईल, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आजच्या बैठकीत सांगितले. महापौरांनी महापालिकेच्या वतीने वकील द्यावा. सध्या न्यायालयाला उन्हाळी सुटी असली तरी सुटीच्या न्यायालयात ही आकडेवारी सादर करावी,' अशी सूचना पवार यांनी केली.

लस आयात करण्याची परवानगी द्या

राज्य सरकारने १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला. परंतु लसींच्या पुरवठ्यात वाढ होईपर्यंत लसीकरणाची अडचण होणार आहे. ४५ वर्षे वयावरील ज्या नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. परंतु दुसरा डोस मिळण्यास विलंब होत आहे. याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने परदेशातून लस आयात करण्यास परवानगी द्यावी. तसेच, केंद्र आणि राज्यांसाठी दर समान असावा, असे पवार यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vertical Property Card : महाराष्ट्रातील प्रत्येक सदनिकेला स्वतंत्र ओळख क्रमांक आणि मालकी हक्कांची सरकारी नोंद मिळणार; महसूल विभागाकडून व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्डचा मसुदा खुला

Hinjewadi Metro : हिंजवडी-वाकडमधील मेट्रो प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी पीएमआरडीएचा निर्णय; २६ जोडरस्त्यांचा विकास, डिसेंबरअखेर प्रत्यक्ष कामांना सुरुवात

High Court Gift Deed Ruling : "२० वर्षांपूर्वी सुनेला बक्षीसपत्राने दिलेली मालमत्ता सासूला परत मागता येणार नाही!" उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

Jalgaon Jalna Railway Line Tunnel : मराठवाडा-खानदेशचा प्रवास सुसाट होणार! जळगाव-जालना रेल्वे मार्गावर बनणार देशातील सर्वात मोठा २३.५ किमीचा बोगदा; ३३६ किमीचे अंतर येणार थेट निम्म्यावर!

Pune News : स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाला ‘डीआयएटी’चे बळ; अत्याधुनिक लेझर आणि फोटॉनिक्स प्रणाली विकसित करणार

SCROLL FOR NEXT