Ajit Pawar News | Ajit Pawar in Ratnagiri esakal
पुणे

'१२ तारखेला बारामतीला जाणार असं म्हटलं होतं, पण आता...' दादांचा रोख कोणाकडे?

सकाळ डिजिटल टीम

एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत थेट शरद पवार यांच्या मुंबईतीन निवासस्थानी हल्ला चढवला. मोठ्या प्रमाणात जमावाने एकत्र येत चप्पल आणि दगडफेक केली. वेळीच पोलिसांनी परिस्थिती हातात आणण्याचा प्रयत्न केला. (Ajit Pawar on ST Worker Strike)

मात्र पोलिसांना या घटनेचा सुगावा लागला नसल्याने अजित पवारांनी खंत व्यक्त केली. मीडियाचे कॅमेरे त्यांच्यापर्यंत पोहोचले. हे मीडियाने शोधून काढलं. पण पोलीस विभागाला का नाही शोधून काढता आलं, याची चौकशी करणार असल्याचं पवारांनी सांगितलं. (Attack on Sharad Pawar House)

आता शरद पवार यांच्या घराव थेट हल्ला झाल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. आंदोलनकर्त्यांना वकील गुणरत्न सदावर्ते यांनी भडकावल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी सदावर्तेंसह १०४ जणांना अटक झालीय. (ST Worker Strike)

या प्रकरणानंतर अजित पवारांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांना चिथावणीखोर भाषणं कोणी दिली. त्यांची माथी कोणी भडकवली, याचा तपास कोणीतरी शक्ती त्यांच्या पाठिशी होती. आम्ही मास्टरमाईंड शोधत आहोत. एका वरीष्ठ अधिकाऱ्याला याची वस्तूस्थिती शोधून काढायला सांगितली आहे.

कोणीतरी १२ एप्रिलला बारामतीत येऊन जाब विचारणार, असं म्हटलं होतं. त्याचीही चौकशी झाली पाहिजे, असं पवार म्हणाले. काही दिवसांपूर्वी गुणरत्न सदावर्ते यांनी भाषणादरम्यान बारामतीत येऊन आंदोलन करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता पवारांचा रोख कोणाकडे असा प्रश्न विचारला जातोय.

काय म्हणाले अजित पवार?

हायकोर्टाच्या निर्णयानंतर मिठाई वाटली. सेलिब्रेशन केलं. हे सगळं झाल्यानंतर सिल्व्हर ओकवर जाण्याचं कोणी धारीष्ट्य केलं.

कोर्टाचा निर्णय हा सर्वोच्च असतो. २२ तारखेचा कोर्टाने दिलेला निर्णय आम्ही पाळला

आजूबाजूच्या राज्यांच्या जवळपास पगार आणण्याचा प्रयत्न आहे.

जोपर्यंत पोलिसांचा अहवाल येत नाही, तोपर्यंत राजकीय आरोप करणं योग्य नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT