मलवडीत कडकडीत बंद
गावोगावी शोकसभा घेऊन वाहिली श्रद्धांजली
दहिवडी, ता. २९ : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दु:खद निधनाच्या बातमीने माण तालुका आजही सावरला नव्हता. दुसऱ्या दिवशी सुद्धा तालुक्यावर दु:खाचे सावट कायम होते. अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी माण तालुक्यातील मलवडीत कडकडीत बंद पाळण्यात आला, तर गावोगावी शोकसभा घेण्यात आल्या.
दहिवडी शहर काल उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आले होते. आजही माण तालुक्यात शोकाकूल वातावरण होते. काल व आज अनेक अनेक ग्रामपंचायतींनी विशेष सभा घेऊन अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. श्रद्धांजली वाहताना ‘आपला हक्काचा माणूस गेला,’ अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. ठिकठिकाणी अजितदादांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तालुक्यातील युवकांनी आणि कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. अजित पवार यांचे माण-खटाव या दुष्काळी भागाशी नेहमीच जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनामुळे या भागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आग्रही असणारा नेता हरपल्याची भावना जनसामान्यांनी व्यक्त केली.
अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज मलवडीतील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मलवडी बंदची हाक दिली होती. या आवाहनाला मलवडीकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आज मलवडी बाजारपेठ व गाव कडकडीत बंद करून अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
...........
07221
मलवडी : गावात कडकडीत बंद पाळून अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. (रूपेश कदम : सकाळ छायाचित्रसेवा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.