पुणे

शिरूरच्या विकासात अजितदादांचे अनमोल योगदान

CD

शिरूर, ता. १ : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली वाहण्यासाठी रविवारी (ता. १) शिरूर येथे गटसचिव संघटनेने आयोजित केलेल्या शोकसभेत अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. शिरूरच्या सर्वांगीण विकासात अजितदादांचे अनमोल योगदान होते. त्यांचे विकासातील योगदान विसरता येणार नाही, अशी भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली.
शिरूरच्या विकासाचे शिल्पकार अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्राने एक कर्तबगार, दूरदृष्टी असलेला आणि जनतेसाठी अखंड झटणारा नेता गमावला असून, शिरुरसाठी ही हानी असल्याची भावना शिरूर तालुक्यातील गटसचिवांच्या वतीने व्यक्त करण्यात आली. यावेळी अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अजित पवार यांचे निधन अत्यंत दुःखद व वेदनादायक आहे. त्यांच्या निधनामुळे सहकार क्षेत्राने एका संवेदनशील नेत्यास गमावले असून, सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशी भावना शिरूर तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटीत काम करणाऱ्या सचिवांनी व्यक्त केली.
यावेळी सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून पवार यांना आदरांजली वाहिली. तसेच, यावेळी त्यांच्या विचारांचा आणि विकासात्मक दृष्टिकोनाचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी शिरूर तालुका सचिव संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पवार, सचिव कैलास लोहार, अनिल वाबळे, सुभाष सातकर, खंडू जगताप, सुखदेव खर्डे यांनी भावना व्यक्त करून आठवणींना उजाळा दिला. तसेच, शिरूर तालुक्यातील विविध कार्यकारी संस्थेवर काम करणारे सर्व सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

06085

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनची वादळी अर्धशतक! गौतम, रोहित, विराटच्या विक्रमाशी बरोबरी; इशानसह ९७ धावा जोडल्या

बीएमसी जिंकताच भाजपची मोठी चाल! मुंबईत ८१ सदस्यीय नवी फौज तयार; टीममध्ये उत्तर भारतीयांचा बोलबाला, कुणाकडे कोणती जबाबदारी?

आपला स्वतःचा चित्रपट आहे असं समजून... आगामी 'राजा शिवाजी' चित्रपटाबद्दल काय म्हणाला रितेश देशमुख

Phulambri News : सुवर्ण महोत्सवी सप्ताहात नामस्मरणाचा अखंड गजर, शेलगाव खुर्द येथे हजारो भाविकांची उपस्थिती; काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता

Kej Bus Accident : केज-कळंब रोडवर एसटी बसचा भीषण अपघात; चालक-वाहकासह १३ प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT