Ajit Pawar visit Baramati today for scarcity-prone areas monsoon rain weather sakal
पुणे

Ajit Pawar : अजित पवार आज बारामती तालुक्याच्या टंचाईग्रस्त भागाचा दौरा करणार…

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज (ता. 8) दुपारच्या सत्रात बारामती तालुक्यातील टंचाईग्रस्त भागांची पाहणी करणार

मिलिंद संगई, बारामती.

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज (ता. 8) दुपारच्या सत्रात बारामती तालुक्यातील टंचाईग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. एक जून पासून बारामती तालुक्यात पावसाने ओढ दिलेली असल्यामुळे तालुक्याच्य अनेक भागात टंचाई सदृश परिस्थिती आहे. अनेक भागातून टँकर तसेच चारा छावण्याची मागणी येत असल्यामुळे या भागात काय उपाययोजना कराव्या लागतील या उद्देशाने अजित पवार यांच्या या दौऱ्याला महत्त्व आहे.

बारामती तालुक्यात यंदा अत्यंत कमी पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. अनेक गावामध्ये खरिपाचे पीक हातातून गेले असून रब्बीच्या पिकासाठी शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. पावसाने ओढ दिलेली असल्यामुळे टंचाईची स्थिती निर्माण झालेली आहे. या भागात गंभीर परिस्थिती निर्माण होईल ही शक्यता गृहीत धरून महसूल विभाग तसेच पंचायत समितीने उपायोजना करण्यास प्रारंभ केला आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघातील अनेक गावातील ग्रामस्थांची अजित पवार यांनी या गावात येऊन पाहणी करावी अशी इच्छा होती, त्यानुसार अजित पवार आज बारामती तालुक्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यामध्ये टंचाई वर मात करण्याच्या दृष्टीने प्रशासनाला ते काय सूचना करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

नव्या सरकारमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांचा हा पहिलाच बारामती तालुका दौरा असल्यामुळे या दौऱ्यामध्ये ते कोणत्या गावांना भेटी देत मदतीच्या दृष्टीने काय घोषणा करतात याकडेही तालुक्यातील ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT