ajit pawar sakal
पुणे

Ajit Pawar : महात्मा गांधी यांनी उपचार घेतलेल्या खोलीला पवारांची भेट

ससून रुग्णालयातील इमारत नूतनीकरणाच्या कामाची पाहणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ससून रुग्णालयातील ज्या खोलीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर ॲपेंडिक्सची शस्त्रक्रिया करण्यात आली, त्या खोलीला शनिवारी (ता.२५) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन, या खोलीची पाहणी केली.

ससून रुग्णालयातील डेव्हिड ससून आणि जेकब ससून या नावांनी असलेल्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इमारतींचे सध्या नूतनीकरण कऱण्यात येत आहे. या इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामांची पाहणी करण्यासाठी पवार यांनी आज ससून रुग्णालयाला भेट दिली. या भेटीच्या वेळी त्यांनी महात्मा गांधी यांच्यावर उपचार करण्यात आलेल्या खोलीची पाहणी करत, गांधी यांच्यावर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेबाबतची माहिती घेतली.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शेखर प्रधान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, ससून सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण जाधव आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

डेव्हिड ससून आणि जेकब ससून या दोन्ही इमारतींचे नूतनीकरण करताना वारसा असलेल्या ऐतिहासिक इमारती जपणे आणि त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यामुळे या इमारतीचे नूतनीकरणही त्याच पद्धतीने दर्जेदार होणे आवश्यक आहे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT