Sharyu Sugar Factory 
पुणे

अजित पवारांच्या भावासह इतर अडचणीत; चार साखर कारखान्यांवर जप्ती

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गाळप हंगाम 2018-19 मधील ऊस उत्पादकांची एफआरपी रक्‍कम थकविणाऱ्या 86 कारखान्यांविरुद्ध आत्तापर्यंत महसुली प्रमाणपत्र जप्ती (आरआरसी) कारवाई करण्यात आली असून, सातारा जिल्ह्यातील आणखी चार कारखान्यांविरुद्ध कारवाईचे आदेश साखर आयुक्‍त शेखर गायकवाड यांनी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या भाऊ श्रीनिवास पवार यांच्या नावावर यातील एक कारखाना आहे. एफआरपीची रक्‍कम न दिल्यास संबंधित कारखान्यांच्या साखर आणि बगॅस विक्रीतून वसुली करण्यात येणार आहे. 

आरआरसी कारवाई करण्यात आलेल्या साखर कारखान्यांमध्ये सातारा जिल्ह्यातील फलटण येथील शरयू शुगर्स ऍग्रो इंडिया लिमिटेड हा कारखाना अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांच्या मालकीचा आहे. तर, शिवसेनेचे पाटणचे आमदार शंभूराजे देसाई यांच्याशी संबंधित लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना, सांगलीचे भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचे भाऊ संग्राम देशमुख यांचा सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील ग्रीन पॉवर शुगर्स लिमिटेड आणि काँग्रेसचे नेते प्रल्हाद साळुंखे यांचा फलटण तालुक्यातील न्यू फलटण शुगर्स लिमिटेड या कारखान्यांचा समावेश आहे.

या तीन कारखान्यांकडे 24 कोटी 97 लाख रुपये इतकी एफआरपीची थकीत रक्‍कम आहे. थकीत रक्‍कम वेळेत न दिल्यास त्यावर 15 टक्‍के व्याजदर आकारण्यात येणार आहे. ही थकीत रक्‍कम वसूल करण्यासाठी साखर कारखान्यांतील उत्पादित साखर आणि बगॅस विक्रीतून शेतकऱ्यांची थकीत देणी द्यावीत, असे आदेशात नमूद केले आहे. या कारवाईसाठी सातारा जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात 2018-19 मध्ये एकूण 195 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला.

या कारखान्यांनी 952 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीपोटी 23 हजार 293 कोटी रक्‍कम देय होती. त्यापैकी 22 हजार 915 कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. 

राज्यात यंदाच्या हंगामात 139 साखर कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्‍कम दिली आहे. अन्य 45 कारखान्यांनी 80 ते 99 टक्‍के रक्‍कम दिली आहे. एफआरपी थकविणाऱ्या 86 कारखान्यांवर आरआरसी कारवाई करण्यात आली. काही कारखान्यांकडे 397 कोटी रुपये थकीत असून, हे प्रमाण केवळ 1.71 टक्‍के आहे. 
- शेखर गायकवाड, साखर आयुक्‍त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काय सांगता? यंदाच्या मान्सूनमध्ये चक्क 'ब्लॅक कार्बन'? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर...

IND vs ENG, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं अखेर पदार्पण झालं, पण कोणाला मिळाला संघातून डच्चू? पाहा भारत-इंग्लंडची Playing XI

NCP Sharad Pawar Merger Rumours: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरणाचे चर्चेला शशिकांत शिंदेंचा ठाम विरोध

Women Farmers Lead: भिवधानोरा गावातील शेतकरी महिलांची जलसंधारण, सेंद्रिय शेती व सामूहिक खरेदीत आदर्श कामगिरी; पाणी फाउंडेशन स्पर्धेत उठून दिसले योगदान

Latest Marathi Live Update : लोणावळ्या कडे जाणाऱ्या रोडवर दरड कोसळली, कातळ धबधबा शेजारची घटना

SCROLL FOR NEXT