ajit pawars refusal to releas bhagat singh koshyari photo with black balloons in air kasba peth assembly by election  
पुणे

Ajit Pawar News : ...अन् अजित पवारांनी थेट हातच जोडले!; पुण्यातील सभेत नेमकं घडलं काय?

सकाळ डिजिटल टीम

Pune assembly by election : पुणे विधानसभा पोटनिवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणूकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजप दोन्हीकडून जोर लावला जात आहे. निवडणूकीत काँग्रेसचे उमेदवरा रविंद्र धंगेकर याच्या प्रचारार्थ कसबा पेठ मतदारसंघात काल प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं. या सभेत झालेल्या प्रकरारानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी थेट हातच जोडल्याचे पाहायला मिळाले.

नेमकं झालं काय?

वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिलेले भगतसिंह कोश्यारी यांचा राज्यपाल पदाचा राजीनामा मंजूर झाला. यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. याबद्दल अनेक राजकीय नेत्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला. राज्यात अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष देखील केला.

यानंतर पुण्यातील सभेत अजित पवार आणि नाना पटोले प्रचारासाठी एका मंचावर आले होते. यावेळी भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्रातून जाणार याचा आनंद व्यक्त करण्यासाठी काळे फुगे आकाशात सोडण्याची योजना कार्यकर्त्यांनी आखली होती. अजित पवार यांच्या हस्ते हे फुगे हवेत सोडून निषेध नोंदविला जाणार होता.

काही कार्यकर्त्यांनी कोश्यारींचा काळ्या फुग्यांना बांधलेला फोटो व्यासपीठावर आणला. तसेच हे फुगे कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या हातात द्यायचा प्रयत्न देखील केला. मात्र, अजित पवार यांनी हात जोडत कोश्यारींचा फोटो असलेला फुगे हातात घ्यायला नकार दिला.

मविआचे कार्यकर्ते आग्रह करत असूनही अजित पवार यांनी शेवटपर्यंत फुगा घेतला नाही. अजित पवार यांनी थेट हात जोडत याला नकार दिला. अखेर पोलिसांनी पुढे येत कार्यकरत्यांकडील फुगे ताब्यात घेतले.

वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा केंद्र सरकारने रविवारी मंजूर केला.तसेच महाराष्ट्राच्या राज्यपालपदी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bapu Pathare: १०० लोक जमा केले अन्...; बापू पठारेंना मारहाण का झाली? पत्रकार परिषदेत आमदारांनी संपूर्ण विषयच उलगडून सांगितला!

दिवाळीत Invitation Cards बनवायचयं? तर Google Geminiचे 'हे' प्रॉम्प्ट वापरा

World Cup 2025: भारताने जिंकलेला टॉस? पण पाकिस्तानी कर्णधार राहिली चूप; IND vs PAK सामन्यापूर्वीच वादग्रस्त घटना; Video

Solapur Crime:'पैशांवरून पत्नीचा खून; पतीस जन्मठेप'; गॅस टाकीसाठी ठेवलेले पैसे पतीने दारुत उडवले, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा ट्रॅक्टरमधून प्रवास

SCROLL FOR NEXT