आगर, महाबरेवाडी येथील आकांक्षा विकास महाबरे या विद्यार्थीनीने खडतर परिस्थितीत शिक्षण पूर्ण करत शालांत परीक्षेत 98 टक्के गुण मिळविले. समवेत वडील विकास महाबरे व आई सुमित्रा महाबरे. 
पुणे

आपल्या मदतीचा एक हात... या गुणवंत विद्यार्थिनीचे घडवेल भविष्य...

मिननाथ पानसरे

आपटाळे - घरात अठरा विश्व दारिद्र्य, एक दीड एकर शेतजमीन कसून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत पाच मुली व एक मुलगा यांचे शिक्षण पूर्ण करण्याचा वडिलांचा कसोशीने केला जाणारा प्रयत्न.... अन वडिलांच्या कष्टाला साजेसे यश दहावीच्या परीक्षेत मिळवत जुन्नर तालुक्यातील आगर, महाबरेवाडी येथील विकास महाबरे यांच्या आकांक्षा महाबरे या मुलीने 98 टक्के गुण मिळविले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हे उत्तुंग यश संपादित करतांना पुढील शिक्षणाची अवघड अन संघर्षमय वाटचाल करण्यासाठी आकांक्षा हिला समाजातून मदतीची अपेक्षा आहे...समाजातील दानशूर अन शिक्षणप्रेमी व्यक्तींकडून आकांक्षाला पुढील शिक्षणासाठी मदत व्हावी अशी अपेक्षा वडील विकास महाबरे व आकांक्षा महाबरे यांच्याकडून केली जात आहे. 

जुन्नर येथील अण्णासाहेब आवटे विद्यामंदिर या विद्यालयातून आकांक्षा ने दहावीचे शिक्षण पूर्ण केले. वडील विकास महाबरे व आई  सुमित्रा महाबरे यांची एक दीड एकर शेती. पाच मुली व एक मुलगा असणाऱ्या महाबरे दांपत्याने तुटपुंज्या शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करत मुलींचे शिक्षण पूर्ण केले. शालांत परीक्षेत आकांक्षाला 98 टक्के गुण प्राप्त झाले आहेत. दररोज जवळपास सहा ते सात किलोमीटर चा प्रवास सायकलने पूर्ण करून अत्यंत खडतर परिस्थितीत जिद्द व कष्टाच्या जोरावर आकांक्षाने दहावीचे शिक्षण पूर्ण केले. व उत्तुंग यश संपादन केले.

आकांक्षाला बारावी नंतर एमबीबीएस चे शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याची इच्छा आहे. मात्र वडिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने आर्थिक परिस्थिती मुळे आकांक्षाच्या पुढील उच्च माध्यमिक शिक्षणात अडथळा निर्माण झाला आहे. गुणवत्ताधारक विद्यार्थिनी असून देखील पुढील शिक्षण पूर्ण कसे कारायचे असा यक्ष प्रश्न तिच्या पालकांपुढे निर्माण झाला आहे. 

समाजातील दानशूर घटकांनी पुढे येऊन आकांक्षाला मदतीचा हात द्यावा असे आवाहन तिचे वडील विकास महाबरे यांनी केले आहे.

मदत करणाऱ्यांनी पुढील खात्यावर मदत जमा करावी. 
खातेधारकाचे नाव - आकांक्षा विकास महाबरे, 
बँकेचे नाव - स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा जुन्नर, 
खाते क्रमांक - 37260149632
IFSC code - SBIN0006443

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT