Baner_Akhada 
पुणे

बाणेर, बालेवाडीत अशी साजरी केली जातेय आखाड पार्टी...

सकाळवृत्तसेवा

बालेवाडी : दहा दिवसांच्या लॉकडाऊनचा दुसरा टप्पा रविवारी सुरू झाला आणि या टप्प्यामध्ये इतर जीवनावश्यक वस्तूंबरोबर खास खवय्या पुणेकरांसाठी मटण, चिकन, मासे, अंडी आदींची दुकाने सकाळी आठ ते संध्याकाळी सहादरम्यान उघडी ठेवण्यास परवानगी मिळाली. त्यामुळे याचाच फायदा घेत बाणेर, बालेवाडीकरांनी चिकन, मटण, मासे यासाठी दुकानांमध्ये चांगलीच गर्दी केली.

आषाढ महिन्यातील शेवटचा रविवार असल्यामुळे खवय्यांनी या दुकानांमधून रांगा लावल्या. काही ठिकाणी सोशल डिस्टंसिंग पाळत तर काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन करत नागरिकांनी कोरोनाची साथ असूनही दुकानातून गर्दी केलेली पाहायला मिळाली. आम्ही पुणेकर कसे खवय्ये आहोत, याचे उदाहरण दिले असल्याचे म्हणावे लागेल. आषाढ महिन्यामधील शेवटचा दिवस म्हणजे आषाढी अमावस्या याला गटारी अमावस्या म्हणूनही ओळखले जाते. या दिवसासाठी  मांसाहारी लोक आधीपासून कार्यक्रमाचे नियोजन  करतात.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या या दिवसाला सणाचे महत्व प्राप्त झाले आहे. अनेक लोक मांस, मद्य व इतर पदार्थांचे सेवन श्रावण महिन्यात करत नाहीत. त्यामुळे श्रावण सुरू होण्यापूर्वीच या गोष्टींवर मनसोक्त हात आडवा मारत मोठ्या प्रमाणात या पदार्थांचे सेवन केले जाते. परंतु यावर्षी आषाढी अमावस्या सोमवारी आल्यामुळे अनेक खवय्यांनी रविवारी हा दिवस साजरा केला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बाणेर बालेवाडी या ठिकाणी सकाळी आठपासूनच चिकन, मटण आणि मासळीच्या दुकानांमध्ये भल्यामोठ्या रांगा च्या रांगा पाहायला मिळाल्या. काही ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत तर काही ठिकाणी गर्दी करत नागरिकांनी या गोष्टींची खरेदी केली. तरी मद्याचे दुकान परवानगी न मिळाल्यामुळे या दुकानांसमोर मात्र शुकशुकाट पाहायला मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT