akhil bharatiya marathi 100th natya sammelan senior artist president post dispute uday samant Sakal
पुणे

Natya Sammelan 2024 : ज्येष्ठ कलाकारांना सन्मानाने अध्यक्षपद द्या; नाट्य संस्थांमधील वादावर भाष्य - सामंत

मंत्री सामंत; शंभराव्या नाट्यसंमेलनाचा शुभारंभ; नाट्य संस्थांमधील वादावर भाष्य

सकाळ वृत्तसेवा

Natya Sammelan : ‘‘नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज करावा लागणे, हा ज्येष्ठ कलाकारांचा अपमान आहे. अध्यक्षपदासाठी आपण ज्येष्ठ कलाकारांची एकमेकांमध्ये झुंज लावणार का? ज्येष्ठ कलाकारांना सन्मानाने अध्यक्षपद केव्हा देणार?’’

अशा परखड शब्दांत राज्याचे उद्योग मंत्री आणि नाट्य संमेलनाचे निमंत्रक उदय सामंत यांनी नाट्य संमेलनाध्यक्षांची निवड व नाट्य संस्थांमधील वादावर भाष्य केले. राजकारणी कायम सॉफ्ट टार्गेट असतात, मात्र राज्यातील नाट्य क्षेत्राला राजकारणाचा लवलेश लावू देऊ नका,

ज्येष्ठ कलाकारांना सन्मानाने अध्यक्षपद देण्यासाठी प्रयत्न करा, अशी विनंतीही मंत्री उदय सामंत यांनी या वेळी केली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने आयोजित शंभराव्या नाट्य संमेलनाच्या शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मावळते संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नियोजित अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, खासदार श्रीनिवास पाटील, नाट्य परिषदेचे तहहयात विश्‍वस्त शशी प्रभू, नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सुरेश खरे, दत्ता भगत, गंगाराम गवाणकर, ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, विश्‍वस्त अशोक हांडे,

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले याप्रसंगी उपस्थित होते. या वेळी ज्येष्ठ कलाकार स्वरूप कुमार, लीला गांधी व सुहासिनी देशपांडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

मंत्री उदय सामंत म्हणाले, ‘‘राजकारणामध्ये गट-तट असू शकतात, मात्र नाट्य परिषदेत गट-तट असता कामा नये. अनेक राजकीय व्यासपीठे तयार होत असतात, मात्र नाट्य चळवळीसाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. नाट्य क्षेत्रासाठी काम करणाऱ्या चेहऱ्यांना अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली देणे अत्यंत गरजेचे आहे.’’

गज्वी म्हणाले, ‘‘गेली पाच वर्षे मी नाट्य संमेलनाध्यक्षपद भूषवीत आहे, उद्या माजी संमेलनाध्यक्ष होईल. पण, कलाकार मात्र कधीही माजी होत नाही. आगामी काळात मराठी रंगभूमी भारतीय रंगभूमीचे प्रतिनिधित्त्व करेल.’’ दामले म्हणाले, ‘‘पाच महिने चालणाऱ्या या नाट्य संमेलनामुळे राज्यभर नाट्यजागर होणार आहे. हे अखिल भारतीय संमेलन असले, तरी सर्वप्रथम राज्यातील कानाकोपऱ्यांत नाटक पोहोचवण्याचा प्रयत्न आहे.’’

...त्यापूर्वी वृद्धाश्रमाच्या कामाचे भूमिपूजन

दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांनी मराठी नाट्य, चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार, तंत्रज्ञ यांच्यासाठी दोन एकर जागा दिली आहे, रत्नागिरीला नाट्य संमेलनाचा समारोप होणार आहे. त्यापूर्वीच गोखले यांनी दिलेल्या जागेत कलाकारांसाठी वृद्धाश्रमाच्या कामाचे भूमिपूजन करू, अशी घोषणा उदय सामंत यांनी या वेळी केली.

‘राजकीय व्यक्तीही कलाकारच’

‘राजकीय व्यक्तीही कसलेले कलाकार असतात. त्यांचा अभिनय आपण पाहिला आहे’, अशी कोपरखळी प्रशांत दामले यांनी आपल्या भाषणात मारली. त्यावर ‘आम्ही कलाकार आहोत, हे दामले यांनी सांगितल्यामुळे बरे झाले.

आता राजकीय व्यक्ती नाट्य संमेलनात येतात, अशी टीका कोणी करणार नाही. आमचा अभिनय सर्वांनी १५ महिन्यांपूर्वी पाहिला आहे. कोणी त्यावर नाटक लिहिले, तर बरे होईल’, असे गंमतीशीर प्रत्युत्तर सामंत यांनी दिले.

‘पक्षीय मतभेद विसरून एकत्र’

‘‘नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त शरद पवार यांचा आणि माझा पक्ष वेगळा, त्यामुळे आमच्यात पक्षीय मतभेद आहेत. मात्र हे मतभेद असले तरी सांस्कृतिक चळवळीला त्यामुळे गालबोट लागू नये, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली, हे आवर्जून सांगायला हवे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील अशीच भूमिका घेत एकदिलाने नाट्य संमेलनासाठी मदत केली’’, असे उदय सामंत यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, 5th T20I: हार्दिक पांड्या पेटला, अभिषेक शर्माचा विक्रम मोडला; तिलक वर्माच्या साथीने भारताला गाठून दिला २३० धावांचा टप्पा

Pune Municipal Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी मनसेकडे तरुणांची गर्दी; ५०० इच्छुकांच्या मुलाखती!

Uruli Kanchan Crime : उरुळी कांचन हद्दीत खुनाची घटना; संशयिताच्या शोधासाठी तीन तपास पथके रवाना!

Sinhagad Fort Exhibition : सिंहगडावर शिवकालीन वैभवाचा जागर; ९९ दुर्ग प्रतिकृतींचे भव्य प्रदर्शन!

AAP BMC Election : ‘आम आदमी पार्टी’चा मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचाच नारा ; सर्व जागांवर उभा करणार उमेदवार!

SCROLL FOR NEXT