Devendra Fadnavis 
पुणे

"CM च्या मानेला पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आठवतो"; फडणवीसांचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला

अभिनेता आम्हाला त्यांच्यातलीच समजतात. त्यांचा पक्का विश्वास झाला की हे नाटक करतातच. काल प्रशांत दामले म्हणाले, अध्यक्ष झाल्यावर मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटलं त्यांनी ही कला जरा आमच्या पक्षातील नेत्यांना सांगावी, असे फडणवीस म्हणाले.

Sandip Kapde

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पिंपरीत अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात बोलताना चांगलीच राजकीय टोलेबाजी केली. CM च्या मानेला पट्टा दिसलो की  िंहासन सिनेमा आठवतो. आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्टा लावण्याची गरज नाही. मी कुणाबद्दल बोललो, हे मला सांगायची गरज नाह, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अभिनेता आम्हाला त्यांच्यातलीच समजतात. त्यांचा पक्का विश्वास झाला की हे नाटक करतातच. काल प्रशांत दामले म्हणाले, अध्यक्ष झाल्यावर मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटलं त्यांनी ही कला जरा आमच्या पक्षातील नेत्यांना सांगावी. मात्र प्रशांत दामले असे मुख्यमंत्री आहेत जे जनतेला हसवतात देखील रडवतात देखील. तुम्ही संवेदनशील अभिनेता  आहात, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आम्हाला देखील परिस्थितीनुसार नाटकं आणि सिनेमाचे स्मरण होतं. मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा दिसला की आम्हाला सिंहासन आम्हाला आठवतो. आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज नाही, मी कुणाबद्दल बोलतोय हे सांगायची देखील गरज नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेतला लगावला.

पुण्यात आलं की आम्हाला विदर्भाचं योगदान सांगावे लागते.पहिले नाट्य संमेलन झालं तेव्हा त्याचे अध्यक्ष आमच्या अमरावतीचे दादासाहेब खापर्डे होते. पण पिंपरीला सांगावं लागत नाही. कारण पिंपरीत अर्धा विदर्भ, अर्धा मराठवाडा आणि अर्धा उत्तर महाराष्ट्र सापडतो. त्यामुळे पिंपरी चिंचवड आम्हाला माहेरासारखं वाटतं. इथं आलो की आपलेच लोक भेटत असतात, असे फडणवीस म्हणाले.

आपल्या क्षेत्रात तिसरी घंटा वाजली की नाटक सुरु होत. आमच्याकडे देखील तसेच आहे. आमच्याकडे तिसरी घंटा आचारसंहीतेची असते. ती घंटा वाजली की आम्ही पोजीशन घेतो. पण चांगल्या तालमी केल्या तर प्रेक्षकांचा आशिर्वाद मिळतो. तसा आम्हाला देखील मिळतो. ज्यांनी केवळ नाटकं केली त्यांना लोक घरी बसवतात. महाराष्ट्राने २०१९ साली प्रयोग झाला. कट्यार पाठीत घुसली. मग २०२२ मध्ये आम्हीही प्रयोग केला. आता होती गेली कुठे? त्याच्यामुळे असे प्रयोग सुरुत असतात, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT