पुणे

वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव : अलकाताई जनमेजयराजे भोसले, लायन्स क्लब शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ शानदार कार्यक्रमाने संपन्न.

CD

AKK26B05878
अक्कलकोट ः येथील लायन्स क्लब शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनप्रसंगी अलकाताई जनमेजयराजे भोसले, अभय खोबरे, राजेंद्र हत्ते, राजशेखर कापसे आदी.

स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव
अलकाताई जनमेजयराजे भोसले; लायन्स प्राथमिक शाळेचे वार्षिक पारितोषिक वितरण

अक्कलकोट, ता. २० ः वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव देणारे व त्यांना घडविण्याचे कार्य करणारे लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट संचलित लायन्स शिशू विकास मंदिर व लायन्स प्राथमिक शाळेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त व हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा अलकाताई जनमेजयराजे भोसले यांनी केले.

येथील प्रियदर्शिनी मंगल कार्यालयात लायन्स शिशु विकास मंदिर व लायन्स प्राथमिक शाळा अक्कलकोटचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात त्या बोलत होत्या. विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या. यामध्ये सोलापूर येथील अनिल राठोड यांनी प्रशिक्षण दिलेल्या छावा व रामायण या पात्रांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली. विविध गाण्याच्या नृत्याने श्रोत्यांची मने जिंकली. विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना याप्रसंगी अलकाताई जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
कार्यक्रमास लायन्स क्लबचे अध्यक्ष राजेंद्र हत्ते, अभय खोबरे, राजशेखर कापसे, डॉ. अरुण परिचारक, मल्लिकार्जुन मसुती उपस्थित होते. याप्रसंगी सुभाष गडसिंग, शिवशरण खुबा, शिरीष पंडित, खजिनदार विठ्ठल तेली, प्रभाकर मजगे, मल्लिनाथ साखरे, शदीद वळसंगकर, चेतन जाधव, प्रकाश उण्णद, सुभाष खमितकर मुख्याध्यापिका श्रीदेवी खुने, महानंदा निलगार, सांस्कृतिक विभागप्रमुख गौरीशंकर चनशेट्टी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT