पुणे

गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी अक्कलकोट येथील जय हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठापना,कळसारोहन सोहळा व होम हव

CD

अक्कलकोटमध्ये शुक्रवारी
हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठापना
कळसारोहण, होम-हवन, महाप्रसादाचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
अक्कलकोट, ता. ३ : लोकमंगल विहार, बासलेगाव रोड, अक्कलकोट येथे शुक्रवारी (ता. ६) जय हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तसेच कळसारोहन सोहळा, होम-हवनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री वटवृक्ष हनुमान मंदिर पंच कमिटीच्या वतीने देण्यात आली.
गुरुवारी (ता. ५) सकाळी साडेनऊ वाजता मूर्ती, कळस व कलश-कुंभ मिरवणूक काढण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता. ६)सकाळी १० वाजता मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, कळसारोहण व होम-हवन कार्यक्रम होणार आहेत. हे धार्मिक विधी श्री ष. ब्र. डॉ. राजशेखर शिवाचार्य महास्वामीजी, श्री म. नि. प्र. बसवलिंग महास्वामीजी, प.पू. श्री मोहन पुजारी महाराज, प.पू. श्री अनु पुजारी महाराज व श्री वे. मू. रुद्रय्या स्वामी यांच्या हस्ते पार पडणार आहेत.
या कार्यक्रमास आमदार सचिन कल्याणशेट्टी, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक- अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले, नगराध्यक्ष मीलन कल्याणशेट्टी, श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिराचे अध्यक्ष महेश इंगळे, अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्यासह उद्योगपती विलास कोरे, एजाज मुतवली, सुनील गोरे, पोलिस निरीक्षक दीपक भिताडे, लोकमान्य उद्योग समूहाचे अध्यक्ष सिद्धाराम टाके, इंजिनिअर महेश शेडम तसेच सर्व नूतन नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.
धार्मिक कार्यक्रमानंतर दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री वटवृक्ष हनुमान मंदिर पंच कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anti Conversion: मोठी बातमी! महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायद्याला मंजुरी; सक्तीचे धर्मांतर आणि लव्ह जिहादवर लगाम लागणार

Latest Marathi News Live Update : एसटी चालक आणि वाहकांची अल्कोहोल तपासणी बंधनकारक

Nashik Water Pipeline : पंचवटीत खासगी कंपनीचा आडमुठेपणा! मुख्य पाईपलाईन फोडली, होळीच्या सणाला नागरिकांचे हाल

Teacher Mobile Ban : अध्यापनावेळी शिक्षकांच्या मोबाईल वापरास निर्बंध; हेरवाडमधील कन्या शाळेच्या व्यवस्थापन समितीचा निर्णय, मोबाईल जमा करण्याचे बंधन

Thane News: मुंबई-ठाणे-कल्याण प्रवास सुसाट होणार! खाली रस्ता, मध्यभागी उड्डाणपूल आणि वर मेट्रो धावणार, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन

SCROLL FOR NEXT