AKK26B06491
योगीराज कुलकर्णी
अक्कलकोट रोडवर टेम्पोची
ट्रकला धडक; चालकाचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
अक्कलकोट शहर, ता. ६ : सोलापूर-अक्कलकोट मार्गावरील कोन्हाळी ब्रिजच्या पुढे टेम्पोने समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने टेम्पो चालकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. ५) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.
हरीश वाघेश्वर गोविन (वय २७, रा. सरसंबा, ता. आळंद, जि. कलबुर्गी, कर्नाटक) यांनी अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गोविन हे ट्रक (क्र. केए ३२ एए ९१९३) घेऊन सोलापूर-अक्कलकोटकडे जात होते. त्यावेळी आळंद येथील योगीराज दादाराव कुलकर्णी (वय ४०) हे टेम्पो (क्र. केए ३२ एए २२७३) घेऊन विरुद्ध दिशेने येत होते.
कुलकर्णी यांनी टेम्पो भरधाव व हयगयीने चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर टेम्पो बल्करच्या दिशेने नेऊन समोरून जोराची धडक दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या अपघातात कुलकर्णी गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. याप्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या योगीराज कुलकर्णी यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व एक मुलगा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.