लोगो : अक्कलकोट नगरपरिषद
---
AKK26B05912
प्रभाग पाणीटंचाईमुक्त करणार
अक्कलकोट : माझ्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये येत्या काळात संपूर्ण दर्जेदार रस्ते, कचरा आणि गटारमुक्त प्रभाग निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच आवश्यक तेथे वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखणार आहे. नागरिकांना वेळेवर, मुबलक व स्वच्छ पाणी पुरविणे, वॉर्डातील सर्व रस्त्यांची दररोज स्वच्छता करणे, नागरिकांच्या व्यक्तिगत व सार्वजनिक स्वरूपातील समस्यांना त्वरित प्रतिसाद देऊन त्या सोडविणे आदी प्रमुख कामे मी अग्रक्रमाने करणार आहे. तसेच प्रभागात दिवाबत्तीची सोय करून प्रभागातील छोट्या- छोट्या गल्लीतील सर्व रस्ते नव्याने तयार करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच नवीन पाणीपुरवठा योजनेचा लाभ प्रभागातील सामान्य नागरिकांना होण्यासाठी मी स्वतः लक्ष घालून नागरिकांना पाणीटंचाईपासून मुक्त करणार आहे.
- कस्तुरा चौगुले, नगरसेवक, अक्कलकोट नगरपरिषद
---
AKK26B05911
संवेदनशील भागात सीसीटीव्ही बसविणार
अक्कलकोट : प्रभाग सातमधील पायाभूत सुविधा मजबूत करणार असून, मुख्य व अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रिट/ डांबरीकरण करून प्रभागाचे सुशोभीकरण करणार आहे. प्रभागात आधुनिक ड्रेनेज व्यवस्था सुरू असून, ती पूर्ण प्रभागात राबविण्याचा संकल्प आहे. तसेच प्रभागात नवीन पाणीपुरवठा योजनेचा लाभ सर्व नागरिकांना होण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहणार आहे. नागरिकांना मुबलक व स्वच्छ पाणी मिळावे यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची ग्वाही देत आहे. प्रभागांमध्ये प्रमुख चौकात व संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून नागरिकांना सुरक्षितता देण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच संपूर्ण प्रभागात एलईडी स्ट्रीट लाइट बसवणार आहे. नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी डिजिटल संपर्क सुविधा उपलब्ध करून देणार आहे. स्वच्छ आणि सुंदर परिसर, घराघरांतून नियमित कचरा संकलन, कचरा वर्गीकरण व स्वच्छता जनजागृती, उद्याने, सार्वजनिक ठिकाणे आणि मंदिर परिसर सुशोभित करणार आहे. तसेच युवकांसाठी आधुनिक ओपन जिम, व्यायामशाळा, क्रीडा साहित्य व मैदाने विकसित करणे, महिलांसाठी स्वावलंबन व कौशल्य प्रशिक्षण शिबिरे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी पाठपुरावा करणार आहे.
- नावीद रफिक डांगे, नगरसेवक, अक्कलकोट नगरपरिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.